|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.85° C

कमाल तापमान : 30.28° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 75 %

वायू वेग : 1.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.28° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.29°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain

अजित पवार यांना राज्यात मध्यावधीची आशा

अजित पवार यांना राज्यात मध्यावधीची आशापुणे, [११ जुलै] – शिवसेनेचे नेते आणि मंत्र्यांची राज्यातील कारभाराबाबतची वक्तव्ये पाहिली तर राज्यातील सत्तेतील सहकार्‍यांचे भाजपासोबत सख्य असल्याचे दिसत नाही. उद्धव ठाकरे यांनी वेगळा विचार केला तर तो दिवस भाजपाचा राज्यातील सत्तेतील शेवटचा दिवस असेल, असे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथे शनिवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नुकतेच सिंधुदुर्ग येथे शिवसेनेने स्वाभिमान दाखविल्यास राज्यात मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतील, असे विधान केले होते....12 Jul 2015 / No Comment /

प्रत्यक्षात दिसू लागला ‘मेक इन इंडियाचा’ परिणाम : मुख्यमंत्री

प्रत्यक्षात दिसू लागला ‘मेक इन इंडियाचा’ परिणाम : मुख्यमंत्रीपुणे, [११ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियासाठी जी धोरणे वेगाने राबवण्यास सुरुवात केली आहे त्याचा परिणाम आज चाकणमधील मर्सिडीज बेंझच्या विस्तारित प्रकल्पात पाहायला मिळतो आहे. ज्या वेगाने केंद्र सरकार काम करते आहे त्याच्याशी सुसंगत पावले राज्यांनी टाकायला हवी आणि महाराष्ट्र त्यात मागे नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे सांगितले . उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी अनुकूल स्थिती निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा भाग आहे आणि...12 Jun 2015 / No Comment /

बिंदुमाधव जोशी कालवश

बिंदुमाधव जोशी कालवशपुणे, [१० मे] – अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, देशातील ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि स्वातंत्र्य सैनिक बिंदुमाधव जोशी यांचे आज रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे. बिंदुमाधव जोशी गेले काही दिवस आजारी होते. यापूर्वी त्यांच्यावर दोनदा हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात...12 May 2015 / No Comment /

तासगावात सुमनताई पाटील विजयी

तासगावात सुमनताई पाटील विजयीसांगली, [१५ एप्रिल] – सांगलीतील तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालात सुमनताई पाटील यांनी १ लाख १२ हजार ९५३ मतांनी विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर राष्ट्रवादीने सुमनताई यांना उमेदवारी दिली होती आणि तासगावच्या मतदारांनीही सुमनताईंवर विश्‍वास व्यक्त करीत त्यांना भरघोस मतदान केले. आबांविषयी आदर राखत अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने आपला उमेदवार दिला नव्हता. तथापि, भाजपाचे बंडखोर उमेदवार ऍड...15 Apr 2015 / No Comment /

नवोदित साहित्य संमेलन २३ पासून तुळजापूरला

नवोदित साहित्य संमेलन २३ पासून तुळजापूरलापुणे, [१४ एप्रिल] – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेले २२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य समेलन २३ आणि २४ मे रोजी तुळजापूर येथे होणार आहे, अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. माजी मंत्री लक्ष्मण ढोवळे यांची संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, उद्‌घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन, कथाकथन आदी...15 Apr 2015 / No Comment /

घुमानमध्ये घुमू लागली स्वातंत्र्य चळवळीची स्तोत्रे

घुमानमध्ये घुमू लागली स्वातंत्र्य चळवळीची स्तोत्रे=भगतसिंग, सुखदेव, राजगुरूचे कुटुंबीय येणार= पुणे, [२२ मार्च] – पंजाबच्या घुमान येथील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र व देशातील अनेक महोत्सव तेथे एकवटत आहेत. म्हणजे तेथे पंढरीची वारीही पोहोचत आहे, पंजाबमधील वैशाखीही साजरी होत आहे आणि भांगडाही सुरू आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेलेले शहीद भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम हरी राजगुरू यांचे कुटुंबीय येथे आगामी ३ ते ५ एप्रिल दरम्यान होणार्‍या संमेलनाला उपस्थित...23 Mar 2015 / No Comment /

११ वा पं जितेंद्र अभिषेकी महोत्सव २० मार्चपासून

११ वा पं जितेंद्र अभिषेकी महोत्सव २० मार्चपासूनपुणे, [१३ मार्च] – ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान व आपला परिसर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ११ व्या पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २२ मार्च दरम्यान घरकुल लॉन्स, म्हात्रे पूल येथे हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती गायक शौनक अभिषेकी यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाची सुरुवात २० मार्च रोजी सायंकाळी ५.३० वा. तुकाराम दैठणकर यांच्या शहनाई वादनाने होईल. त्यानंतर...14 Mar 2015 / No Comment /

स्वच्छ इंधनावर संशोधन करावे : गडकरी

स्वच्छ इंधनावर संशोधन करावे : गडकरी=एआरएआयतर्फे आयोजित सियाट-२०१५ परिषदेचा समारोप= पुणे, [२३ जनेवारी] – भारताला सध्या दरवर्षी सहा लाख कोटी रुपयांचे खनीज इंधन परदेशी चलनात विकत घ्यावे लागते. ही स्थिती बदलण्यासाठी स्वच्छ इंधनावर अधिकाधिक संशोधन करावे, त्यासाठी शेतकर्‍यांनाही बरोबर घ्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी द ऑटोमोटीव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सिम्पोजियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटीव्ह टेक्नोलॉजी २०१५ (सियाट) या स्वयंचलित वाहनांच्या तंत्रज्ञानविषयक...24 Jan 2015 / No Comment /