|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.15° C

कमाल तापमान : 30.38° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 1.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.38° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

28.74°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain

नितीशकुमार पुन्हा नेते

नितीशकुमार पुन्हा नेते=बिहारमधील सत्तासंघर्षाला नवे वळण, जीतन राम मांझी यांची हकालपट्टी= पाटणा, [७ फेब्रुवारी] – गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बिहारमधील सत्तासंघर्षाला आज शनिवारी वेगळेच वळण मिळाले. मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असतानाच, जदयुने मात्र मांझी यांचीच मुख्यमंत्रिपदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली. यानंतर झालेल्या जदयु विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवे नेते अर्थातच बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून पक्षाचे वरिष्ठ नेते नितीशकुमार यांची एकमताने निवड करण्यात आली. लोकशाहीची अक्षरश: खिल्ली...8 Feb 2015 / No Comment /

जदयु फुटीच्या उंबरठ्यावर

जदयु फुटीच्या उंबरठ्यावरमुख्यमंत्री मांझींचाच बंडाचा झेंडा २० ला बोलावली विधिमंडळ पक्षाची बैठक पाटणा, [६ फेब्रुवारी] – विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या बिहारमधील सत्तारूढ जदयुमध्ये उभी फूट पडणे आता अटळ आहे. मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी स्वत:च पक्षनेतृत्वाविरुद्ध बंडाचा झेंडा हाती घेतल्याने जदयुमध्ये घमासान सुरू झाले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी उद्या शनिवारी बोलावलेली जदयु विधिमंडळ पक्षाची बैठक अनधिकृत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहाचा नेता या अधिकार्‍याने मांझी यांनी येत्या २० तारखेला विधिमंडळ...7 Feb 2015 / No Comment /

बिहार निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात

बिहार निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात=रामविलास पासवान यांची माहिती= पाटणा, [२८ जानेवारी] – रालोआतील मुख्य घटक असलेला भाजपा हा आम्हाला मोठ्या भावासारखा आहे आणि बिहारमध्ये याचवर्षी होणारी विधानसभेची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढणार आहोत, अशी माहिती लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी येथे दिली. बिहार निवडणुकीत रालोआतील घटक पक्षांमध्ये जागावाटप हा फार मोठा मुद्दा राहणार नाही. लोजपाला किती जागा मिळतील, हादेखील आमच्यासाठी चिंतेचा विषय नाही. आपल्या पक्षाला इतक्याच...29 Jan 2015 / No Comment /

बिहारच्या न्यायालय परिसरात आत्मघाती हल्ला

बिहारच्या न्यायालय परिसरात आत्मघाती हल्ला=तीन ठार, १६ जखमी, दोन कैदी फरार= आरा, [२३ जानेवारी] – बिहारच्या आरा येथील दिवाणी न्यायालयाच्या संकुलात झालेल्या मानवी बॉम्ब स्फोटात एका पोलिसासह तिघांचा मृत्यू झाला असून, अन्य १६ जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर दोन कैदी पळाले असल्याची माहिती आहे. या न्यायालयात काही कुख्यात कैद्यांना हजर करण्यासाठी आणले असता, मानवी बॉम्ब बनलेल्या एका महिलेने सकाळी साडेअकराच्या सुमारास हा स्फोट घडवून आणला. तिने आपल्या बॅगमध्ये शक्तिशाली स्फोटके पेरून ठेवली होती....24 Jan 2015 / No Comment /

बिहारसाठी भाजपाचे ‘मिशन १८५’

बिहारसाठी भाजपाचे ‘मिशन १८५’=पंतप्रधान होण्यासाठीच कॉंगे्रसशी हातमिळवणी : अमित शाहंचा नितीशकुमारांवर हल्ला= पाटणा, [२३ जानेवारी] – याचवर्षी विधानसभेची निवडणूक होणार असलेल्या बिहारमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शुक्रवारी ‘मिशन १८५’ अर्थातच १८५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. भाजपाध्यक्षांनी यावेळी माजी मुख्यमंत्री आणि जदयु नेते नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला केला. पंतप्रधान होण्याची आपली व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नितीश कुमार यांनी कॉंगे्रससोबत हातमिळवणी केली. प्रख्यात समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांच्या तत्त्वांचा हा...24 Jan 2015 / No Comment /