|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.23° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 1.77 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.81°C - 31.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.58°C - 31.35°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.47°C - 30.26°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.66°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.35°C - 29.99°C

broken clouds

मध्यप्रदेशात ११७७ गावांना पुराचा फटका

मध्यप्रदेशात ११७७ गावांना पुराचा फटकाआपत्ती निवारण दलाकडून बचावकार्य, भोपाळ, ४ ऑगस्ट – मागील काही दिवसांपासून मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर-चंबल भागात मुसळधार पावसामुळे जवळपास १,१७७ गावांना पुराचा फटका बसला आहे. २०० गावांना सर्वाधिक धोका झाला. शिवपुरी आणि श्योपूर जिल्ह्यात पूरस्थिती अधिकच बिकट झाली असून, नागरिकांसह पाळीव प्राणी आणि वन्यजीवांची सुरक्षित सुटका करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान जोरदार प्रयत्न करत आहेत. मुसळधार पावसाने शिवपुरी जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. याठिकाणी मागील काही तासांत ८०० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली...5 Aug 2021 / No Comment /

होशंगाबादचे नाव होणार ‘नर्मदापुरम्’ : शिवराजसिंह

होशंगाबादचे नाव होणार ‘नर्मदापुरम्’ : शिवराजसिंहभोपाळ, २० फेब्रुवारी – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी होशंगाबादचे नाव बदलून नर्मदापुरम् करण्याची घोषणा केली असून, याबाबतचा अधिकृत प्रस्ताव आता केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे ते म्हणाले. नर्मदा जयंतीनिमित्त होशंगाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत सूतोवाच केले. कार्यक्रमादरम्यान होशंगाबादचे नाव बदलून नर्मदापुरम् करायचे, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थितांना विचारला असता, त्यावर जनतेने एकमुखाने सहमती दर्शविली. यावेळी राज्य सरकार नर्मदा काठावर सिमेंट कॉंक्रीटच्या संरचना बांधायला परवानगी देणार नाही, असे त्यांनी जनतेला...21 Feb 2021 / No Comment /

मध्यप्रदेश मंत्रिमंडळाचा विस्तार

मध्यप्रदेश मंत्रिमंडळाचा विस्तारभोपाळ, ३ जानेवारी – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज रविवारी आपल्या मंत्रिमंडळाचा दोन नव्या मंत्र्यांचा समावेश करून विस्तार केला. हे दोन्ही मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. तुलसीराम सिलवट आणि गोविंद राजपूत अशी या नव्या मंत्र्यांची नावे असून, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी राजभवनात झालेल्या साध्या समारंभात त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री चौहान, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्‍वर शर्मा आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. मागील वर्षी...3 Jan 2021 / No Comment /

धर्मांतरविरोधी अध्यादेशाला मध्यप्रदेश मंत्रिमंडळाची मंजुरी

धर्मांतरविरोधी अध्यादेशाला मध्यप्रदेश मंत्रिमंडळाची मंजुरीभोपाळ, २९ डिसेंबर – लग्नाचे आमिष दाखवून आणि बळजबरीच्या धर्मांतरावर बंदी घालणार्‍या आणि दोषींविरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या अध्यादेशाला मध्य प्रदेशातील भाजपा सरकारने आज मंगळवारी मंजुरी दिली. अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी हा अध्यादेश आता राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारनेही अशाच प्रकारचा कायदा पारित केला आहे. मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य विधेयक असे या कायद्याचे नाव असून, लग्नाचे आमिष किंवा इतर मार्गाने हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर करणार्‍यांविरोधात...29 Dec 2020 / No Comment /

मध्य प्रदेशातही धर्मांतरविरोधी कायदा

मध्य प्रदेशातही धर्मांतरविरोधी कायदा१० वर्षांच्या कारावासाची तरतूद, भोपाळ, २६ डिसेंबर – बळजबरीने धर्मांतर करून विवाहासाठी बळजबरी करण्याच्या प्रकरणांवर कायमचा आळा घालण्यासाठी मध्य प्रदेशातही धर्मांतरविरोधी कायदा मंजूर करण्यात आला आहे. बळजबरीने धर्मांतर करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही अशा प्रकारचा कायदा असावा, या विचारातून हा कायदा तयार करण्यात आला असून, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या आज शनिवारी झालेल्या बैठकीत या कायद्याला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री नरोत्तम...26 Dec 2020 / No Comment /

मध्यप्रदेशात भाजपाला किमान १८ जागा!

मध्यप्रदेशात भाजपाला किमान १८ जागा!नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर – मध्यप्रदेश, गुजरात आणि उत्तरप्रदेश या तीन राज्यांमध्येही विधानसभेच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. सत्तांतरानंतर मध्यप्रदेशातील निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. कारण, या निवडणुकीच्या निकालावर शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. जनमत कौलनुसार, या राज्यात भाजपाला १६ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास चौहान सरकार बहुमतात येईल आणि सरकारवरील धोकाही दूर होईल. मध्यप्रदेशात २८ जागांसाठी मतदान झाले यातील १६-१८ जागा भाजपाला, तर १०-१२...7 Nov 2020 / No Comment /

भाजपाचे संकेतस्थळ हॅक

भाजपाचे संकेतस्थळ हॅकभोपाळ, [१९ ऑगस्ट] – मध्यप्रदेश भाजपाचे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सने हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजपा संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर मुसलमानांना मारणे बंद करा, अशा मजकुरासोबतच पाकिस्तानचा झेंडा अपलोड करण्यात आला आहे. पाकिस्तान जिंदाबाद, काश्मीर व भारतातील मुस्लिमांना मारणे बंद करा, असा मजकूर संकेतस्थळाच्या मुख्य पानावर आज शुक्रवारी प्रसिद्ध झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही हे संकेतस्थळ हॅक करण्यात आले होते. भाजपाच्या संकेतस्थळासारखे दिसणारे हे संकेतस्थळ कुणीतरी तयार केले आहे. भाजपाचे हे...21 Aug 2016 / No Comment /

दिग्विजयसिंह यांची न्यायालयात हजेरी

दिग्विजयसिंह यांची न्यायालयात हजेरी=सचिवालयातील नियुक्ती घोटाळा= भोपाळ, [२७ फेब्रुवारी] – विधिमंडळ सचिवालयातील नियुक्त्यांमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह आज शनिवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने शुक्रवारी दिग्विजयसिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. या घोटाळ्यात दिग्विजयसिंह आरोपी असून, शनिवारी ते विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश काशीनाथसिंह यांच्यासमोर हजर झाले. याप्रकरणी १६९ पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, दिग्विजयसिंह हजर न झाल्यामुळे न्यायालयाने वॉरंट बजावला होता. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अरुण...28 Feb 2016 / No Comment /

दिग्विजयसिंह करणार न्यायालयासमोर आत्मसमर्पण

दिग्विजयसिंह करणार न्यायालयासमोर आत्मसमर्पणनवी दिल्ली, [२७ फेब्रुवारी] – मध्य प्रदेश विधानसभा भरती गैरव्यवहार प्रकरणी कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांच्या अटकेचे आदेश निघाले होते. त्यानंतर आज शनिवारी ते न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार आहेत. याप्रकरणी दिग्विजयसिंह यांच्याविरोधात भाजपने याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. मात्र यावेळेस दिग्विजयसिंह न्यायालयात उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट प्रसिद्ध केले होते. शेवटी आज दिग्विजयसिंह न्यायालयात आत्मसमर्पण करणार आहेत. तसेच आपली बाजूही न्यायालयात मांडणार आहेत....27 Feb 2016 / No Comment /

शिवराजसिंहांनी पूर्ण केली दहा वर्षांची कारकीर्द

शिवराजसिंहांनी पूर्ण केली दहा वर्षांची कारकीर्दभोपाळ, [२९ नोव्हेंबर] – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज रविवारी मुख्यमंत्रिपदाची दहा वर्षांची कारकीर्द पूर्ण केली. सलग दहा वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविणारे ते पहिलेच गैरकॉंगे्रसी नेते ठरले आहेत. असे करताना त्यांनी १९९३ ते २००३ असा सलग काळ मुख्यमंत्रिपदी राहिलेले दिग्विजयसिंह यांचाही विक्रम मोडित काढला आहे. व्यावसायिक परीक्षा मंडळातील (व्यापमं) कथित घोटाळा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत झालेला भाजपाचा पराभव या दोन घटना शिवराजसिंह यांच्या कारकीर्दीला त्रासदायक ठरल्या असल्या, तरी त्यांचा एकूण कार्यकाळ...30 Nov 2015 / No Comment /

राज्यपालांना हटविण्याची मागणी

राज्यपालांना हटविण्याची मागणी=व्यापमं घोटाळा, सुप्रीम कोर्टाची राज्यपालांना, केंद्राला नोटीस= नवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] – प्रचंड गाजलेल्या मध्यप्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) भरतीत झालेल्या कथित घोटाळ्यात सहभागी असलेले राज्यपाल राम नरेश यादव यांना पदावरून हटविण्याची विनंती करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी केंद्र सरकार आणि स्वत: राज्यपालांना नोटीस जारी केली आहे. पदावर असताना राज्यपालांचा एखाद्या घोटाळ्यात सहभाग असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना पदावरून तातडीने हटविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे तयार करावी, असे निर्देश सर्वोच्च...21 Nov 2015 / No Comment /

हॉटेलात लपवलेल्या स्फोटकांचा स्फोट, ८९ ठार

हॉटेलात लपवलेल्या स्फोटकांचा स्फोट, ८९ ठारशंभरावर जखमी अनेक इमारतींना तडे मध्यप्रदेशच्या झाबुआतील घटना मृतांच्या निकटवर्तीयांना दोन लाखांची मदत राज्य सरकारचे चौकशीचे आदेश झाबुआ, [१२ सप्टेंबर] – मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील पेटलावाड शहरात अतिशय वर्दळीच्या एका हॉटेलात लपवून ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचा आज शनिवारी सकाळी भीषण स्फोट होऊन हॉटेलचा अक्षरश: ढिगारा झाला. यात ८९ जणांचा मृत्यू झाला असून, शंभरावर लोक जखमी झाले आहेत. सरकारने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी...13 Sep 2015 / No Comment /