|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 19:02
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.5° C

कमाल तापमान : 29.51° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 80 %

वायू वेग : 3.54 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.5° C

Weather Forecast for
Tuesday, 18 Jun

27.99°C - 30.35°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 19 Jun

28.16°C - 30.6°C

moderate rain
Weather Forecast for
Thursday, 20 Jun

28.62°C - 30.45°C

moderate rain
Weather Forecast for
Friday, 21 Jun

29.22°C - 30.89°C

light rain
Weather Forecast for
Saturday, 22 Jun

28.94°C - 30.58°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 23 Jun

28.51°C - 29.45°C

light rain

विरोधकांची मानसिकता दलितविरोधी

विरोधकांची मानसिकता दलितविरोधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदेत हल्लाबोल, नवी दिल्ली, १९ जुलै – पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सोमवारी गोंधळ झाला, त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करावे लागले. या गोंधळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून देता आला नाही. दलित, महिला, ओबीसी, शेतकरी, आदिवासी केंद्रात मंत्री झाल्याचे विरोधकांना पाहावले नाही. विरोधकांची मानसिकता महिला व दलितविरोधी आहे, असा संताप पंतप्रधानांनी व्यक्त केला. सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच नवीन...20 Jul 2021 / No Comment /

भारत विदेशी गुंतवणूकदारांचे आकर्षण केंद्र ः सीतारामन्

भारत विदेशी गुंतवणूकदारांचे आकर्षण केंद्र ः सीतारामन्नवी दिल्ली, १९ जुलै – भारताची मजबूत पायाभूत सुविधा आणि प्रचंड मोठी बाजारपेठ यामुळे हा देश विदेशी गुंतवणूकदारांचे आकर्षण केंद्र बनला असून, या बळावर भारतात विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज सोमवारी लोकसभेत केले. सीतारामन् यांनी यावेळी जागतिक गुंतवणूक अहवालाचा संदर्भ दिला. २०२० मध्ये विदेशी गुंतवणुकीत २५.४ टक्क्यांची वाढ झाली होती. या काळात देशात एकूण ६४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारतात आली....20 Jul 2021 / No Comment /

कोणत्याही विषयांवर चर्चेला तयार

कोणत्याही विषयांवर चर्चेला तयारनवी दिल्ली, १८ जुलै – संसदीय नियम आणि प्रक्रियेनुसार कोणत्याही विषयावर संसदेत चर्चा करायला सरकार तयार आहे, पण ही चर्चा निकोप आणि सार्थक असली पाहिजे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी दिली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे, त्या पृष्ठभूमीवर आज सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मोदी बोलत होते. लोकप्रतिनिधींच्या विशेषत: विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधीच्या सूचना महत्त्वपूर्ण असतात, कारण ते लोकांमधून आलेले असतात, त्यामुळे त्यांनी...18 Jul 2021 / No Comment /

संसद अधिवेशनात २३ विधेयके येणार

संसद अधिवेशनात २३ विधेयके येणारनवी दिल्ली, १७ जुलै – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार, १९ जुलैपासून सुरुवात होणार आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्र्यांची या अधिवेशनातील ही पहिलीच परीक्षा असणार आहे. या अधिवेशनात एकूण २३ विधेयक सरकारकडून प्रस्तावित आहेत. त्यापैकी ६ जुनी तर १७ नवी विधेयके आहेत. शेतकरी आंदोलन, कोरोनाची दुसरी लाट आणि तिसर्‍या लाटेची भीती तसेच केंद्र सरकारची व्यापक लसीकरण मोहीम या पृष्ठभूमीवर हे अधिवेशन होत आहे. १९ जुलै ते १३ ऑगस्ट असा अधिवेशनाचा कालावधी...17 Jul 2021 / No Comment /

पीयूष गोयल भाजपाचे राज्यसभेतील नेते

पीयूष गोयल भाजपाचे राज्यसभेतील नेतेनवी दिल्ली, १४ जुलै – राज्यसभेतील उपनेते असलेले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची या वरिष्ठ सभागृहातील भाजपाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत थावरचंद गहलोत या सभागृहात भाजपाचे नेते होते, पण त्यांची अलिकडेच कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने, हे पद रिक्त झाले आहे. त्यांची जागा आता पीयूष गोयल यांनी घेतली. तिहेरी तलाकवर बंदी घालणारे आणि कलम ३७० निष्प्रभ करणारे महत्त्वाचे विधेयक पारित करण्यात पीयूष गोयल यांनी महत्त्वाची भूमिका...14 Jul 2021 / No Comment /

…आता चर्चा मंत्रिमंडळ विस्ताराची

…आता चर्चा मंत्रिमंडळ विस्ताराचीनवी दिल्ली, २६ जून – जम्मू-काश्मीरबाबतची सर्वपक्षीय बैठक समाधानकारकपणे पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदलाकडे लागले आहे. यावेळी २७ नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याबाबत तसेच मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर राज्यात विधानसभा निवडणूक घेण्यावर बैठकीत जवळपास एकमत झाले आहे. राज्यात राजकीय प्रक्रिया सुरू करण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना या बैठकीतून दिशा मिळाली आहे, त्यामुळे मोदी सरकार उत्साहात आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा...26 Jun 2021 / No Comment /

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार?नवी दिल्ली, १२ जून – केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता उच्चस्तरीय सूत्रांनी वर्तवली आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकांच्या सत्रांनंतर या चर्चेला वेग आला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा जोर आता कमी झाला आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी यापेक्षा दुसरी चांगली वेळ असू शकत नाही, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन कोरोनामुळे...13 Jun 2021 / No Comment /

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणीपरमबीरसिंहांच्या पत्राचे लोकसभेत पडसाद, भाजपा सदस्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, नवी दिल्ली, २२ मार्च – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणी वसुलीच्या आरोपांचे संतप्त पडसाद आज लोकसभेत उमटले. या मुद्यावरून भाजपा सदस्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. भाजपाचे गिरीश बापट, नवनीत राणा, पूनम महाजन, कपिल पाटील आदी सदस्यांनी शून्य तासात अतिशय आक्रमकपणे हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रात राष्ट्रपती...23 Mar 2021 / No Comment /

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वित्त संस्था

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वित्त संस्थाकेंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय, नवी दिल्ली, १६ मार्च – देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने विकास वित्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय आज मंगळवारी घेतला आहे. २० हजार कोटींच्या भांडवलातून या संस्थेची निर्मिती केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रपरिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी याबाबत माहिती दिली. अर्थमंत्रालयाच्या यासंदर्भातील प्रस्तावाला आज मंजुरी देण्यात आली....17 Mar 2021 / No Comment /

आता चोवीस आठवड्यांपर्यंतही गर्भपात शक्य

आता चोवीस आठवड्यांपर्यंतही गर्भपात शक्यराज्यसभेत विधेयकाला मंजुरी, नवी दिल्ली, १६ मार्च – विशेष आणि अपवादात्मक स्थिती असलेल्या महिलांकरिता २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी देणार्‍या विधेयकाला राज्यसभेने आज मंगळवारी मंजुरी दिली. विरोधकांनी मात्र हे विधेयक निवड समितीकडे पाठविण्याची मागणी केली आहे. सध्या २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी देणारा कायदा आहे. ही मर्यादा वाढवून २४ आठवडे करण्याची तरतूद असलेले विधेयक सभागृहात सादर केल्यानंतर त्यावर चर्चा झाली. यानंतर विधेयक मंजूर करण्यात आले. बलात्कारपीडित मुलगी किंवा महिला, व्यभिचाराला...16 Mar 2021 / No Comment /

पेट्रोलवर ३३, डिझेलवर ३२ रुपयांची कमाई

पेट्रोलवर ३३, डिझेलवर ३२ रुपयांची कमाईसरकारने केले लोकसभेत मान्य, नवी दिल्ली, १५ मार्च – प्रती लिटर पेट्रोलच्या विक्रीमुळे सरकारला ३३ रुपयांची आणि डिझेलच्या विक्रीमुळे ३२ रुपयांची कमाई होत असते, अशी कबुली केंद्र सरकारतर्फे आज सोमवारी लोकसभेत देण्यात आली. ६ मे २०२० नंतर पेट्रोल व डिझेलवर अबकारी शुल्क, उपकर आणि अधिभार लावण्यात आल्याने, त्यावर अनुक्रमे ३३ आणि ३२ रुपये प्रती लिटर कमाई होत आहे. यापूर्वी ही कमाई अनुक्रमे २३ आणि १९ रुपये अशी होती, असे सांगण्यात...16 Mar 2021 / No Comment /

लोकसभा, राज्यसभेचे कामकाज आता सकाळी ११ पासून

लोकसभा, राज्यसभेचे कामकाज आता सकाळी ११ पासूननवी दिल्ली, ८ मार्च – लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज आता आपल्या पूर्वनिर्धारित वेळेत होणार आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ६ पर्यंत चालेल. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात राज्यसभा आणि लोकसभेचे अधिवेशन वेगवेगळ्या वेळात बोलावले जात होते. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २, तर लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत होत होेते. मात्र, या वेळा गैरसोयीच्या असल्याची तक्रार अनेक...8 Mar 2021 / No Comment /