|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 19:02
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.12° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 4.41 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Tuesday, 18 Jun

28.88°C - 30.99°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 19 Jun

28.16°C - 30.6°C

moderate rain
Weather Forecast for
Thursday, 20 Jun

28.62°C - 30.45°C

moderate rain
Weather Forecast for
Friday, 21 Jun

29.22°C - 30.89°C

light rain
Weather Forecast for
Saturday, 22 Jun

28.94°C - 30.58°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 23 Jun

28.51°C - 29.45°C

light rain
Home »

अमिताभ बच्चन यांचा ७२ वा वाढदिवस साजरा

अमिताभ बच्चन यांचा ७२ वा वाढदिवस साजरामुंबई, [११ ऑक्टोबर] – अमिताभ बच्चन यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. जगभरातील चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहे. या शुभेच्छांबद्दल चाहत्याचे आभार स्वीकारताना बच्चन यांनी ‘तुमचं प्रेम माझं टॉनिक आहे, हे प्रेम असेच राहू दया’, अशी भावना व्यक्त केली. गेली चार दशके आपल्या अभिनय, स्टाईल आणि विनम्रता या गुणांच्या जोरावर लाखो रसिक प्रेक्षकांच्या हृदयात असलेले अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. अमिताभ बच्चन यांना यशाच्या सर्वोच्च...12 Oct 2014 / No Comment /

गायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन

गायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधनपुणे, [२ ऑक्टोबर] – गाजलेल्या चित्रपट गीतांमुळे आणि आपल्या सुरेलआवाजामुळे रसिकांच्या मनात जागा मिळविणारे ख्यातनाम पार्श्‍वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असे कुटुंब आहे. ‘निसर्गराजा ऐक सांगतो…’ आणि ‘कोण होतीस तू काय झालीस तू…’ या गाजलेल्या गीतांसोबतच अशांती चित्रपटातील ‘शक्ती दे मा’, ‘कुदरत’ या चित्रपटाच्या शिर्षक गीतामुळे ते विशेष लोकप्रिय झाले होते. पं. सदाशिवरावबुवा जाधव...3 Oct 2014 / No Comment /

राणीचा ‘मर्दानी ’ यशस्वी

राणीचा ‘मर्दानी ’ यशस्वीमुंबई, [२२ ऑगस्ट] – ‘सिंघम रिटर्न्स’ मध्ये करीना कपूर अजय देवगणला गमतीनेच म्हणते की, आता लेडी सिंघम यायला हवा आणि हा योगायोग म्हणावा की काय दुसर्‍याच शुक्रवारी राणीचा ‘मर्दानी’ चित्रपट पडद्यावर झळकतो. राणी मुखर्जी यात लेडी सिंघमच्या रूपात म्हणजे पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसते. ‘मर्दानी ’म्हणजे चोर आणि पोलिसांचा खेळ. मात्र चाईल्ड ट्रॅफिं किंगची पार्श्‍वभूमी या चित्रपटात दाखविली आहे. वर्षानुवर्ष सुरू असलेला देह व्यापार आणि त्यात प्रामुख्याने लहान अनाथ मुलींना ओढले...25 Aug 2014 / No Comment /

स्मिता तळवलकर यांचे निधन

स्मिता तळवलकर यांचे निधन=मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रावर शोककळा= मुंबई, [६ ऑगस्ट] – मराठी बातम्यांसाठी वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्दीचा प्रारंभ करणार्‍या आणि नंतरच्या काळात अभिनेत्री, रंगकर्मी, निर्माती व दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रात वाटचाल करीत मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत उंच ‘झोका’ घेणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे आज कर्करोगाने निधन झाले. ‘झोका एकच झोका, चुके काळजाचा ठोका’ हे गीत असलेल्या ‘चौकट राजा’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीचे शिखर गाठणार्‍या स्मिता तळवलकर यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट व नाट्य...7 Aug 2014 / No Comment /

‘एक विलेन’ सुपरहिट

‘एक विलेन’ सुपरहिट=पहिल्याच आठवडयात ५० करोड= बालाजी मोशनचा ‘एक विलेन’ २७ जून रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने शुक्रवार ते रविवारपर्यंत ५० करोडपर्यंतची कमाई केली आहे. २०१४ च्या ‘जय हो’ नंतर ‘एक विलेन’ हा पहिल्या आठवडयात सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या गाण्याने लोकांवर आधीच जादू केली होती. लवकरच ‘एक विलेन’ १०० कोटीच्या दरात जाणार असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. असे झाले तर २०१४ मध्ये १०० कोटीच्या वर...1 Jul 2014 / No Comment /

रजनीकांतचे ट्विटर विश्‍वात पदार्पण

रजनीकांतचे ट्विटर विश्‍वात पदार्पणचेन्नई, (५ मे) – सुप्रसिद्ध तामिळ सुपरस्टार रजनीकांत हेदेखील अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासारख्या भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीत समाविष्ट झाले असून, त्यांनी अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर ट्विटर या आधुनिक युगाची देण असलेल्या सोशल मीडियात प्रवेश केला. ‘..सुपरस्टाररजनी’ हे ६३ वर्षीय तामिळ अभिनेत्याचे अधिकृत ट्विटर हॅन्डल असून, या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर पदार्पण केल्यानंतर अवघ्या एका तासात त्यांचे ५२ हजार चाहते तयार झाले आहेत. ‘देवाला नमस्कार करून ट्विटरच्या विश्‍वात पदार्पण करीत आहे...5 May 2014 / No Comment /

फाळके पुरस्कार विजेते मूर्ती काळाच्या पडद्याआड

फाळके पुरस्कार विजेते मूर्ती काळाच्या पडद्याआडबंगळुरू, (७ एप्रिल) – प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. के. मूर्ती यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. ‘प्यासा’, ‘साहिब, बिबी और गुलाम’ आणि ‘कागज के फूल’ या गुरुदत्त यांच्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी सिनेमॅटोग्राफी करण्यासाठीही त्यांना काही प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गुरुदत्त यांच्या मनातले नेमके हेरणारे आणि त्यानुसारच सिनेमॅटोग्राफी करणारे कलावंत अशी त्यांची ओळख होती. ‘आर पार’ या चित्रपटातही त्यांनी गुरुदत्त...7 Apr 2014 / No Comment /

पाकविरोधी चित्रपट करणार नाही : ओम पुरी

पाकविरोधी चित्रपट करणार नाही : ओम पुरीलाहोर, (१३ मार्च) – आपल्या सशक्त अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळेही कायमच चर्चेत राहणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी आपण यापुढे पाकिस्तानविरोधातील चित्रपटात काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान आणि भारतीय चित्रपटसृष्टीत परस्परांविषयी द्वेषभावना निर्माण करणार्‍या चित्रपटांची निर्मितीच करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘मी याआधी ‘गद्दार’ नावाच्या पाकविरोधी चित्रपटात काम केले आहे. पण, त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे मी भविष्यात अशा चित्रपटात काम करणार नाही. उभय देशांतील नागरिकांच्या भावना...14 Mar 2014 / No Comment /

तर पाक सिनेमात काम : शबाना आझमी

तर पाक सिनेमात काम : शबाना आझमीमुंबई, (११ फेब्रुवारी) – ‘सिंध महोत्सवासाठी कराचीत आल्यामुळे मला खूप छान वाटत आहे. चांगली पटकथा मिळाल्यास पाकिस्तानी चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे’ बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी म्हटले आहे. पाकिस्तान पीपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी आयोजित केलेल्या सिंध महोत्सवात त्या बोलत होत्या. मुळात आपला व्यवसायच अभिनय करण्याचा असल्याने चांगली पटकथा आणि विषय उत्तम असल्यास कुठेही काम करण्याची तयारी असल्याचे त्या म्हणाल्या. पाकिस्तानला आल्याने नेहमीच आनंद होतो, कारण दोन्ही...12 Feb 2014 / No Comment /

ओवेसीच्या समर्थकांनी ‘जय हो’ पाहू नये

ओवेसीच्या समर्थकांनी ‘जय हो’ पाहू नये=सलमानचे ओवेसीच्या आवाहनाला प्रत्युत्तर= मुंबई, (२५ जानेवारी) – ज्यांना एमआयएमचे संस्थापक खासदार असदेद्दिन ओवेसी यांच्याबद्दल नितांत आदर आहे अशांनी माझा ‘जय हो’ हा चित्रपट कधीही पाहू नये, अशा शब्दात अभिनेते सलमान खान यांनी ओवेसीच्या आवाहनाला प्रत्युत्तर दिले आहे. सलमान खान यांनी पहिल्यांदाच एखाद्या राजकीय नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या आठवड्‌यात सलमान खान एका आंतरराष्ट्रीय पंतगमहोत्सवात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती.त्यावर आंध्र प्रदेशातील खासदार...26 Jan 2014 / No Comment /

सुचित्रा सेन कालवश

सुचित्रा सेन कालवशकोलकाता, (१७ जानेवारी) – हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयासह देखणेपणाने अधिराज्य गाजविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे आज सकाळी कोलकात्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. सुचित्रा सेन यांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रक्तातील प्राणवायूची पातळी कायम ठेवण्यासाठी त्यांच्या श्‍वसनमार्गात बसविलेली नळी काढून टाकण्यात आली होती. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये साचलेले पाणी काढून टाकण्याचा...18 Jan 2014 / No Comment /

पद्मभूषणसाठी निवड झाल्याने खूष आहे

पद्मभूषणसाठी निवड झाल्याने खूष आहे=कमल हसन= मुंबई, (३१ जानेवारी) – पद्मश्री मिळवल्यानंतर आता पद्मभूषण पुरस्कारासाठी माझ्या नावाची घोषणा झाल्याने मला एक पाऊल पुढे गेल्यासारखे वाटत आहे. मी खुश आहे. अनेक वेळा मोठे कार्य करणार्‍या लोकांचा या देशाला विसर पडतो. परंतु या सर्वश्रेष्ठ पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याबद्दल मी त्याचा विनम्रतेने स्वीकार करतो, असेही दाक्षिणात्य सुपरस्टार दिग्दर्शक हसनने म्हटले आहे. पद्मश्री हा भारताचा प्रतिष्ठित पुरस्कार अभिनेता कमल हसनने यापूर्वीच जिंकला आहे. आता भारत सरकारच्यावतीने पद्मभूषण पुरस्काराने...1 Jan 2014 / No Comment /