|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.85° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 89 %

वायू वेग : 1.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Monday, 20 May

29.02°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.64°C - 30.26°C

light rain
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » विषमतामुक्त समृद्ध देश हाच भाजपाचा संकल्प

विषमतामुक्त समृद्ध देश हाच भाजपाचा संकल्प

nitin gadkari1मुंबई, [६ ऑक्टोबर] – सत्ता असताना कधीही जातीचे भले न करणार्‍या काही नेत्यांना सत्ता गेली की जात आठवते. भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट असून पक्षाला गरीब माणूस केंद्रबिंदू मानून असा विषमतामुक्त समृद्ध देश निर्माण करायचा आहे की, कोणाला आरक्षण मागायची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले.
भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीच्या समारोप सत्रात मुंबईत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश प्रभारी सरोज पांडे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पांडुरंग फुंडकर, विनोद तावडे आणि सुभाष देशमुख, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार व ठाणे विभाग अध्यक्ष खा. कपिल पाटील उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले की, सत्तेवर असताना जे नेते आपल्या जातीचे काही भले करत नाहीत त्यांना सत्ता गेल्यावर जातीची आठवण येते. त्यांना केवळ सत्तेसाठी व स्वतःच्या लाभासाठी जातीचा पाठिंबा हवा असतो. भारतीय जनता पार्टीची मात्र स्पष्ट भूमिका आहे. भाजपाला कोणतीही सामाजिक व आर्थिक विषमता नसलेला देश उभा करायचा आहे.
त्यांनी सांगितले की, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष हे गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. गरीब हा केवळ गरीब असतो, त्याला कोणतीही जात नसते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांनुसार गरीब हा आमचा केंद्रबिंदू आहे. रोजगाराची निर्मिती करणारे आर्थिक धोरण हे आपले वैशिष्ट्य आहे. एक असा सुखी संपन्न देश बनविण्याचा संकल्प आपल्या पक्षाने केला आहे की, जेथे कोणालाही आरक्षण मागायची वेळ येणार नाही.
प्रदेशाध्यक्ष दानवे
केंद्र व राज्य सरकारने चांगले काम केले असून जनतेतून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपाला आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत यश मिळवताना अडचण येणार नाही. राज्य सरकारला ३१ ऑक्टोबरला दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा विशेष मोहीम चालवेल, असे यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले.
त्यांनी असेही सांगितले की, भाजपामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश करत असून पक्षात येणार्‍या सर्वांना सन्मान दिला जाईल. आपल्या संघटनेचे जाळे मजबूत करण्याचा विचार सर्वांनी ठेवावा.
डॉ. सरोज पांडे यांचेही यावेळी भाषण झाले. प्रदेश भाजपाचे नूतन उपाध्यक्ष म्हणून प्रसाद लाड व सरचिटणीस म्हणून आ. संजय कुटे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. राज्य स्काऊट गाईड संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रदेश भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंढे यांचा सत्कार करण्यात आला.

Posted by : | on : 7 Oct 2016
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g