किमान तापमान : 28.86° C
कमाल तापमान : 30.28° C
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 81 %
वायू वेग : 5.08 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.28° C
28.46°C - 30.99°C
broken clouds28.56°C - 30.3°C
light rain28.68°C - 29.84°C
light rain28.69°C - 29.97°C
overcast clouds28.63°C - 29.8°C
light rain29.04°C - 29.88°C
light rainअगरतळा, (१२ जानेवारी) – अयोध्येतील मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत जनजागृती करण्यासाठी विश्व हिंदू परिषदतर्फे शनिवारी अगरतळा येथे रॅलीचे आयोजन केले आहे.
विवेकानंद मैदानावर होणार्या या रॅलीला त्रिपुरातील सुमारे सात हजार धार्मिक नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, असे विहिंपचे राज्य सचिव शंकर रॉय यांनी सांगितले. आम्ही आधीच घरोघरी जाऊन मोहीम सुरू केली आहे. लोकांना २२ जानेवारीला अयोध्येत होणार्या राम मंदिराच्या अभिषेक, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची माहिती सांगितली आहे. याशिवाय विहिंप १३ जानेवारीला अभिषेक सोहळ्याचे महत्त्व लोकांना सांगण्यासाठी रॅलीचेही आयोजन करणार आहे, असे ते म्हणाले. आम्ही लोकांना २२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत टीव्हीवर कार्यक्रम पाहण्याचे आवाहन करू. विशेष कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग समाज माध्यम प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल, असे ते म्हणाले. त्या दिवशी, पुजारी राज्यातील सर्व मंदिरांमध्ये विशेष विधी करतील. लोकांना प्रभू रामासाठी घरोघरी पाच दिवे लावण्याचे आवाहन केले.