किमान तापमान : 29.15° C
कमाल तापमान : 30.38° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 78 %
वायू वेग : 1.95 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.38° C
28.74°C - 32.15°C
sky is clear28.65°C - 31.48°C
sky is clear28.57°C - 30.39°C
sky is clear28.58°C - 30.33°C
broken clouds28.41°C - 30.14°C
broken clouds28.64°C - 30.26°C
light rainनवी दिल्ली, (१९ फेब्रुवारी) – दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होण्यास नकार दिला आहे. केजरीवाल यांनी एक-दोनदा नव्हे तर सहाव्यांदा असे केले आहे.
ईडीच्या नोटीसवरही अरविंद केजरीवाल आज हजर होणार नाहीत, असे आम आदमी पार्टीने (आप) म्हटले आहे. ईडीच्या नोटिसा बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे आपने म्हटले आहे. ’आप’च्या म्हणण्यानुसार, समन्सच्या वैधतेचा मुद्दाही कोर्टात प्रलंबित आहे. ईडी स्वतः कोर्टात गेली होती, त्यामुळे आता पुन्हा पुन्हा समन्स पाठवण्याऐवजी कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी, असे ’आप’ने म्हटले आहे. १४ फेब्रुवारीला ईडीने केजरीवाल यांना सहावे समन्स पाठवले होते आणि त्यांना १९ फेब्रुवारीला ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी केजरीवाल यांना ईडीने या वर्षी ३ जानेवारी, १८ जानेवारी आणि २ फेब्रुवारी आणि गेल्या वर्षी २०२३ मध्ये २ नोव्हेंबर आणि २१ डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मुख्यमंत्र्यांनी या नोटीस बेकायदेशीर ठरवून त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे.
उल्लेखनीय आहे की, दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने या प्रकरणात पूर्वी पाठवलेल्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ईडीने दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई करताना केजरीवाल यांना १७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. न्यायालयाने म्हटले होते की, केजरीवाल हे प्रथमदर्शनी कायदेशीररित्या त्याचे पालन करण्यास बांधील आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की केजरीवाल अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना पाठवलेल्या समन्सकडे दुर्लक्ष करत आहेत.