|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 19:02
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.9° C

कमाल तापमान : 29.96° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 77 %

वायू वेग : 4.56 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.96° C

Weather Forecast for
Tuesday, 18 Jun

28.97°C - 30.19°C

moderate rain
Weather Forecast for
Wednesday, 19 Jun

28.26°C - 30.38°C

moderate rain
Weather Forecast for
Thursday, 20 Jun

28.66°C - 30.29°C

moderate rain
Weather Forecast for
Friday, 21 Jun

28.85°C - 30.62°C

moderate rain
Weather Forecast for
Saturday, 22 Jun

29.04°C - 30.35°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 23 Jun

28.62°C - 29.29°C

moderate rain
Home » राष्ट्रीय, संसद » आझाद यांना निरोप देताना मोदी झाले भावुक!

आझाद यांना निरोप देताना मोदी झाले भावुक!

गुलाम नबींनी पक्षासोबतच देशाचीही चिंता केली,
नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पक्षासोबत देशाचीही चिंता केली, तसेच विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात काम करताना आदर्श निर्माण केला, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी काढले.
विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त होत आहे. त्यांना निरोप देण्याच्या समारंभात मोदी अतिशय भावुक झाले होते. त्यांचा कंठ दाटून आला, डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. आझाद माझे जवळचे मित्र आहेत, विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना त्यांनी जे मापदंड प्रस्थापित केले. त्याची पूर्तता करताना नवीन विरोधी पक्षनेत्याला खूप जड जाणार आहे, असे मोदी म्हणाले.
मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आझाद जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी जम्मू-काश्मिरात दहशतवाद जोरात होता. दहशतवाद्यांनी एका बसवर हल्ला चढवून काही पर्यटकांची हत्या केली, यात गुजरातमधील पर्यटकांचाही समावेश होता. याबाबतची माहिती मला देताना आझाद यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
गुजरातमधील पर्यटकांचे मृतदेह परत आणण्यासाठी विमान उपलब्ध करून देण्याची विनंती मी तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली होती. त्यांनी त्याला अनुमतीही दिली. रात्री मला पुन्हा आझाद यांचा दूरध्वनी आला, तेव्हा ते विमानळावर होते. घरातील एखाद्या व्यक्तीची काळजी घ्यावी, तशी काळजी आझाद यांनी तेव्हा गुजरातमधील पर्यटकांचे मृतेदह परत पाठवताना घेतली होती, हे सांगताना मोदी यांचा आवाज दाटून आला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा आझाद यांचा दूरध्वनी आला आणि त्यांनी सर्व पार्थिव गुजरातमध्ये नीट पोहोचले का, याची चौकशी केली, असे त्यांनी सांगितले.
खूप वर्षापूर्वी संसदेच्या कॉरिडॉरमध्ये मी आणि आझाद बोलत होतो. त्यावेळी पत्रकारांना उद्देशून आझाद म्हणाले की, तुम्ही आम्हाला टीव्ही आणि वृत्तपत्रातून सतत भांडताना पाहिले असाल, पण आम्ही येथे एका परिवारासारखेही राहात असतो. निरोपाचे भाषण करताना गुलाम नबी आझाद यांनाही दाटून आले. माझे आईवडील वारले, तेव्हाही मी ढसाढसा रडलो नाही, मात्र संजय गांधी, इंदिरा गांधी तसेच राजीव यांच्या मृत्यूच्यावेळी माझ्या भावना अनावर झाल्या. मी ढसाढसा रडलो, असे आझाद म्हणाले.

Posted by : | on : 10 Feb 2021
Filed under : राष्ट्रीय, संसद
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g