|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 19:02
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.99° C

कमाल तापमान : 30.43° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 5.14 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Tuesday, 18 Jun

28.88°C - 30.21°C

moderate rain
Weather Forecast for
Wednesday, 19 Jun

28.52°C - 30.49°C

moderate rain
Weather Forecast for
Thursday, 20 Jun

28.46°C - 30.34°C

moderate rain
Weather Forecast for
Friday, 21 Jun

28.94°C - 30.89°C

light rain
Weather Forecast for
Saturday, 22 Jun

28.9°C - 30.45°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 23 Jun

28.53°C - 30.1°C

moderate rain
Home » राष्ट्रीय, संरक्षण » उल्फाचा उपकमांडर दृष्टी राजखोवा शरण

उल्फाचा उपकमांडर दृष्टी राजखोवा शरण

नवी दिल्ली/१२ नोव्हेंबर – उल्फाचा (आय) डेप्युटी कमांडर-इन-चीफ दृष्टी राजखोवाने लष्करासमोर शरणागती पत्करल्याने ईशान्येतील बंडखोरांना मोठा झटका बसला आहे. त्याने चार अंगरक्षकांसह शरणागती पत्करली. लष्करी गुप्तचर विभागातील एका तरुण अधिकार्‍याने सतत नऊ वर्षांपासून घेतलेल्या प्रयत्नांमुळे त्याची शरणागती शक्य झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मेजर राभा किंवा दृष्टी असोम नावाने ओळखल्या जाणार्‍या दृष्टी खोवाने बुधवारी रात्री उशिरा भारतीय लष्कराच्या रेड हॉर्न डिव्हिजनमध्ये शरणागती पत्करली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. तो रॉकेट प्रोपाईल्ड ग्रेनेड चालवण्यात निष्णात असून, ईशान्येत झालेल्या काही हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. उल्फाचा (आय) कमांडर-ईन-चीफ राजेश बरुआ याचा तो निकटवर्तीय आहे. बरुआ सध्या चीनमध्ये दडून बसला आहे. बरुआने बढती देण्यापूर्वी तो उल्फाच्या (आय) १०९ बटालियनचा कमांडर होता.
राजखोवाच्या शरणागतीमुळे बरुआ, उल्फा (आय), कार्यकर्ते आणि या क्रूर संघटनेच्या रचनेला तीव्र धक्का बसला आहे, असे सूत्रांनी सांगितले. बरुआ देत असलेल्या निर्देशांनुसार राजखोवा ईशान्य आणि बांगलादेशातील कारवायांचा सूत्रधार झाला होता. ढाक्यापासून १२० किलोमीटर अंतरावरील मायमनसिंह गावात तो दडून बसला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विविध बंडखोर संघटनांना तो शस्त्रास्त्रांची तस्करी करायचा. यासाठी तो कायम मेघालयमधील गारो हिल्स आणि बांगलादेशात फिरत राहायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली. गारो बंडखोरांनी त्याला नेता मानले होते.
कित्येक चकमकींतून थोडक्यात वाचला
राजखोवा कित्येक चकमकींमधून थोडक्यात वाचला आहे. अलिकडेच २० ऑक्टोबर रोजी झालेल्या चकमकीतही तो वाचला होता. त्याने पत्करलेल्या शरणागतीमुळे केंद्र सरकार आणि लष्कराला मोठे यश प्राप्त झाले, असे सूत्रांनी सांगितले.
‘एमआय’चा कॅप्टन ९ वर्षांपासून संपर्कात
राजखोवाने शरणागती पत्करावी यासाठी लष्करी गुप्तचर विभागाचा (एमआय) एक तरुण कॅप्टन २०११ पासून त्याच्या संपर्कात होता. कित्येक वेळा बदली झाल्यानंतरही त्याने कॅप्टनने प्रयत्न सोडले नाहीत. या कालावधीत वैयक्तिक सुरक्षेला दुय्यम मानत कॅप्टन त्याला शरणागती पत्करण्यासाठी प्रोत्साहन देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अज्ञात स्थळी पाठवले
बुधवारी मध्यरात्री राजखोवाच्या शरणागतीची मोहीम सुरू झाली. त्याने लष्करी अधिकार्‍यांसमोर एके-८१ रायफल आणि दोन पिस्तूल ठेवल्या. सुरक्षेचा विचार करून राजखोवा आणि त्याच्या चार अंगरक्षकांना अज्ञात स्थळी पाठवण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Posted by : | on : 12 Nov 2020
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g