किमान तापमान : 28.85° C
कमाल तापमान : 30.28° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 78 %
वायू वेग : 1.68 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.28° C
28.94°C - 32.15°C
sky is clear28.65°C - 31.48°C
sky is clear28.57°C - 30.39°C
sky is clear28.58°C - 30.33°C
broken clouds28.41°C - 30.14°C
broken clouds28.64°C - 30.26°C
light rain– चंद्राच्या ध्रुवीय शोध मोहिमेवर काम करणार,
नवी दिल्ली, (१८ नोव्हेंबर) – चांद्रयान-४ मोहिमेबाबत अहमदाबादमधील इस्रो केंद्राचे संचालक नीलेश देसाई म्हणाले की, आम्ही चांद्रयान-४ मोहिमेची योजना आखली आहे. याला लूनर सॅम्पल रिटर्न मिशन म्हटले जाईल. या मोहिमेत आपण चंद्रावर उतरू आणि त्याच्या पृष्ठभागावरील नमुने परत करू शकू. चांद्रयान-३ च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था आता आणखी दोन चंद्र शोध मोहिमांवर काम करत आहे.
अहमदाबाद येथील इस्रो केंद्राचे संचालक नीलेश देसाई यांनी शुक्रवारी पुण्यातील भारतीय हवामानशास्त्र संस्थेच्या ६२ व्या स्थापना दिन सोहळ्याला संबोधित करताना सांगितले की, यावेळी आम्ही चंद्राच्या ध्रुवीय शोध मोहिमेवर काम करणार आहोत. चांद्रयान-३ सह आम्ही ७० अंशांवर गेलो. ल्युपेक्स मिशनमध्ये आम्ही चंद्राच्या गडद बाजूचे निरीक्षण करण्यासाठी ९० अंशांवर जाऊ आणि तेथे ३५० किलोग्रॅम वजनाचा एक मोठा रोव्हर उतरवू. चांद्रयान-३ चे रोव्हर केवळ ३० किलो वजनाचे होते, त्यामुळे या मोहिमेतील लँडर देखील खूप मोठा असेल. चांद्रयान-४ मोहिमेबाबत देसाई म्हणाले, आम्ही चांद्रयान-४ मोहिमेची योजना आखली आहे. याला लूनर सॅम्पल रिटर्न मिशन म्हटले जाईल. या मोहिमेत आपण चंद्रावर उतरू आणि त्याच्या पृष्ठभागावरील नमुने परत करू शकू. यूएस स्पेस एजन्सी नासा आणि इस्रो यांनी अंतराळ संशोधनात भविष्यातील सहकार्याच्या संभाव्य संधींवर चर्चा केली. नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेचे संचालक लॉरी लेशिन यांनी इस्रोच्या मुख्यालयाला भेट दिली आणि भारतीय अंतराळ संस्थेचे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव एस सोमनाथ यांच्याशी बैठक घेतली. ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे इस्रोने म्हटले आहे.