किमान तापमान : 29.99° C
कमाल तापमान : 30.43° C
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 70 %
वायू वेग : 5.14 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
28.88°C - 30.21°C
28.52°C - 30.49°C
28.46°C - 30.34°C
28.94°C - 30.89°C
28.9°C - 30.45°C
28.53°C - 30.1°C
नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर – हल्लेखोर नवनवीन उपकरणांचा वापर करत असताना, सुरक्षा संस्थादेखील सज्ज होत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ड्रोन हल्ल्याचा धोका लक्षात घेता ड्रोन विध्वंसक तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा वापर सीमाभागात शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठीही ते तैनात करण्यात येणार आहे.
या नवीन तंत्रज्ञान प्रणालीद्वारे ड्रोेन्सचे सिग्नल बंद पाडले जाऊ शकतात, त्याचबरोबर लेजरने लक्ष्य निश्चित करत त्याचा ठावठिकाणाही हे तंत्रज्ञान देऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबतची आव्हाने लक्षात घेता, हे तंत्रज्ञान त्यांच्या सुरक्षेतही तैनात करण्यात आले आहे. पंतप्रधानाच्या ताफ्यात हे ड्रोन विध्वंसक राहणार आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा अधिक मजबुत होईल.
पाकिस्तान काश्मीर आणि पंजाबमध्ये सीमेवर ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रपुरवठा करत असल्याचे उघड झाले आहे. असे अनेक ड्रोन्स लष्कराने जप्त आणि नष्टही केले आहेत. त्याचबरोबर मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर हे ड्रोन विध्वंसक मोलाची भूमिका पार पाडतील. घ(वृत्तसंस्था)
लस निर्मार्त्यांशी संवाद
कोरोना विषाणूवर लस विकसित करीत असलेल्या देशातील तीन बड्या निर्मार्त्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोमवारी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने आज टि्वट करून, याबाबतची माहिती दिली. जेनोव्हा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डीज या तीन लस निर्मार्त्यांसोबत मोदी आभासी माध्यमातून संवाद साधणार आहेत. जेनोव्हो बायोफार्मा ही पुण्यातील कंपनी असून, ती एमआरएनए या नावाची लस विकसित करीत आहे.