किमान तापमान : 30.43° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.14 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
28.88°C - 30.99°C
28.52°C - 30.49°C
28.46°C - 30.34°C
28.94°C - 30.89°C
28.9°C - 30.45°C
28.53°C - 30.1°C
नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर – भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तीन देश गुंतवणूक आणि व्यापार वाढविण्यासोबतच यातील अडथळे दूर करण्यासाठी त्रिपक्षीय चौकट तयार करणार आहे. पुरवठा साखळी लवचिकतेचा (एससीआरआय) एक भाग म्हणून चर्चेला अंतिम रूप दिले जाणार असून, यात उद्योग आणि शैक्षणिक संस्था अधिक मजबूत करण्यासाठी त्रिपक्षीय प्रयत्न केले जाणार आहेत.
तीनही देश औद्योगिक पार्क स्थापन करण्याचा विचार करीत आहे. व्यापार आणि गुंतवणुकीतील अडथळे दूर करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केला जाणार आहे तसेच धोका व्यवस्थापन यंत्रणा उभारून जल आणि वायुमार्ग जोडणी भक्कम केली जाईल. पारदर्शकता वाढवण्यासाठी व्यवसायातील दस्तावेजांचे डिजिटायझेशन आणि माहितीचे आदान-प्रदान केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चीनचे अवलंबित्व संपुष्टात आणून भारत-प्रशांत क्षेत्रातील पुरवठा साखळी पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने जपानने याबाबत पुढाकार घेऊन दोन्ही देशांना प्रस्ताव दिला आहे. आसियान-जपान लवचिक आर्थिक कृती योजना आणि भारत-जपान स्पर्धात्मक औद्योगिक भागीदारीच्या धर्तीवर ही त्रिपक्षीय चौकट उभारण्याची जपानची योजना आहे.
उद्योग आणि शैक्षणिक संस्थाना सहभागी करण्यासाठी ट्रॅक १.५ या चर्चेअंतर्गत अंतिम रूप दिले जात आहे. सुरक्षित पुरवठा साखळी उभारण्यासाठी समविचारी देशांचाही यात समावेश करण्याचा विचार केला जात आहे, अशी माहिती एका अधिकार्याने दिली.
२०१९ साली या तीनही देशांचे सकल राष्ट्रीय उत्पादन ९.३ ट्रिलियन डॉलर्स इतके होते तसेच वस्तू आणि सेवांचा व्यापार अनुक्रमे २.७ व ०.९ ट्रिलियन डॉलर्सचा होता. हे तीनही देश व्यावसायिक दस्तावेजांचे डिजिटायझेशन करण्याची, व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रोत्साहन, क्षमता तसेच सहकार्य वाढवण्यासाठी क्षेत्रांची ओळख पटविण्याची योजना तयार करीत आहेत.
कच्चा माल, भांडवली आणि ग्राहक वस्तू तसेच सहकार्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू व्यापार परिमाणांच्या दृष्टीकोनातून किमान १० उत्पादने आणि श्रेणी ओळखल्या गेल्या आहेत, असे अधिकार्यांनी सांगितले. यामध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे, पेट्रोलियम आणि पेट्रोरसायन, पोलाद, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवांचा समावेश आहे.