किमान तापमान : 27.99° C
कमाल तापमान : 28.93° C
तापमान विवरण : light rain
आद्रता : 83 %
वायू वेग : 2.94 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.99° C
27.99°C - 30.35°C
28.16°C - 30.6°C
28.62°C - 30.45°C
29.22°C - 30.89°C
28.94°C - 30.58°C
28.51°C - 29.45°C
नवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी सशस्त्र दलातील निवृत्ती वेतनधारकांना दिवाळीपूर्वी ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेअंतर्गत थकबाकीचा तिसरा हप्ता जारी करण्याच्या सूचना दिल्या. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेंतर्गत सशस्त्र दलातील कर्मचा-यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली होती.
संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितले की, स्पर्श प्रणालीद्वारे पेन्शन प्राप्त करणा-या संरक्षण निवृत्ती वेतनधारकांसाठी ओआरओपी रकमेचा तिसरा हप्ता दिवाळीपूर्वी जारी करण्याचे निर्देश संरक्षणमंत्र्यांनी मंत्रालयाला दिले आहेत. बँका आणि इतर संस्थांनाही निर्देश देण्यात आले आहेत की त्यांनी सर्व संरक्षण निवृत्ती वेतनधारकांसाठी हेच धोरण अवलंबवावे. संरक्षण मंत्रालयाची स्पर्श ऑनलाईन पेन्शन वितरण प्रणाली २०२१ मध्ये सुरू करण्यात आली.