|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 19:02
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.5° C

कमाल तापमान : 29.51° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 80 %

वायू वेग : 3.54 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.5° C

Weather Forecast for
Tuesday, 18 Jun

27.99°C - 30.35°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 19 Jun

28.16°C - 30.6°C

moderate rain
Weather Forecast for
Thursday, 20 Jun

28.62°C - 30.45°C

moderate rain
Weather Forecast for
Friday, 21 Jun

29.22°C - 30.89°C

light rain
Weather Forecast for
Saturday, 22 Jun

28.94°C - 30.58°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 23 Jun

28.51°C - 29.45°C

light rain

मिग-२१ मधून सुखोई -३० एमकेआयमध्ये रूपांतरित

मिग-२१ मधून सुखोई -३० एमकेआयमध्ये रूपांतरित– भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचा ताफा अद्यावत, नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – भारतीय हवाई दलाची उत्तरलाई (बाडमेर) हवाई तळावर स्थित क्रमांक ४ ची स्क्वाड्रन (ऊरिअल्स) मिग-२१ मधून सुखोई -३० एमकेआयमध्ये रूपांतरित करण्यात आली असून १९६६ पासून मिग-२१ चे परिचालन करणार्‍या स्क्वाड्रनचा इतिहासातील निर्णायक क्षण आहे. मिग -२१ हे भारतीय हवाई दलाच्या सेवेतील पहिले स्वनातीत(सुपरसॉनिक) लढाऊ विमान आहे आणि १९६३ मध्ये हवाई दलात या विमानाचा समावेश झाला होता, तेव्हापासून सर्व...1 Nov 2023 / No Comment /

२६ राफेल विमानांच्या खरेदीवर शिक्कामोर्तब

२६ राफेल विमानांच्या खरेदीवर शिक्कामोर्तबनवी दिल्ली, (२८ ऑक्टोबर) – भारताने नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल विमानांच्या खरेदीवर शिक्कामोर्तब केले आहे. राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीच्या निर्णयाबद्दल फ्रान्सला औपचारिकपणे कळवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. संरक्षण मंत्रालयाने जुलैमध्ये फ्रान्सकडून राफेल (सागरी) लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी मंजुरी दिली होती तसेच संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या नुकत्याच झालेल्या पॅरिस भेटीत राफेलच्या नौदल आवृत्तीच्या खरेदीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर भारताकडून राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीचा निर्णय फ्रान्सला औपचारिकरीत्या पत्राद्वारे कळवण्यात आला. फ्रान्सकडून...28 Oct 2023 / No Comment /

दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी भारत ड्रोन तैनात करणार

दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी भारत ड्रोन तैनात करणारनवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – सीमेवर कोणताही दहशतवादी हल्ला किंवा कारवाया रोखण्यासाठी भारत ड्रोन तैनात करत आहे. एका अहवालानुसार भारत आपल्या सीमेवर पाळत ठेवणारी यंत्रणा उभारत आहे. या अंतर्गत, ड्रोन तैनात केले जात आहेत जेणेकरुन पाळत ठेवली जाईल आणि कोणत्याही कारवाईला तत्काळ प्रत्युत्तर देता येईल. या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या मते, संरक्षण अधिकार्‍यांनी नुकतीच पाळत ठेवण्याशी संबंधित वस्तू आणि ड्रोन बनवणार्‍या सहा कंपन्यांच्या लोकांना भेटले होते. हमासच्या इस्रायलवर अचानक...27 Oct 2023 / No Comment /

हुतात्मा अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना कोटींपेक्षा जास्त मदत

हुतात्मा अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना कोटींपेक्षा जास्त मदत– राज्यातर्फे दहा लाखांची मदत, – राहुल गांधींच्या आरोपावर लष्कराची स्पष्टोक्ती, नवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – सियाचीन येथे कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेले बुलढाण्यातील अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्तीची मदत केली जाणार असल्याचे लष्कराने सोमवारी स्पष्ट केले. जवानाच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई संबंधित अटी आणि सेवा शर्तींद्वारे दिली जाते, असे राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांच्या पृष्ठभूमीवर लष्कराने सांगितले. अक्षय यांच्या शोकाकूल कुटुंबाला पाठिंबा देताना अतिरिक्त महासंचालनालय, सार्वजनिक...27 Oct 2023 / No Comment /

गिनीचे आखात: युरोपीय महासंघ, भारत यांचा पहिला संयुक्त नौदल सराव

गिनीचे आखात: युरोपीय महासंघ, भारत यांचा पहिला संयुक्त नौदल सरावनवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – गिनीच्या आखाती प्रदेशामध्ये नौदलविषयक सागरी सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठीचा प्रयत्न म्हणून भारत आणि युरोपीय महासंघ या देशांच्या जहाजांनी या प्रदेशात संयुक्त सराव केला. दिनांक २४ ऑक्टोबर २०२३ रोजी, युरोपीय महासंघ आणि भारत या देशांनी गिनीच्या आखातात त्यांचा पहिला संयुक्त सागरी सराव केला. या सरावापूर्वी, ५ ऑक्टोबर २०२३ रोजी ब्रसेल्स येथे भारत-युरोपीय महासंघ सागरी सुरक्षा चर्चा मंचाची तिसरी बैठक पार पडली. गिनीच्या आखातात मंगळवारी झालेल्या संयुक्त सरावात,...27 Oct 2023 / No Comment /

हवाई युद्धकला विश्लेषणातून शिकायला हवे: राजनाथ सिंह

हवाई युद्धकला विश्लेषणातून शिकायला हवे: राजनाथ सिंहनवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – हवाई युद्धाच्या क्षेत्रात नवनवीन कल पुढे येत आहेत आणि संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी त्यांचे विश्लेषण करणे, त्यामधून शिकणे आवश्यक आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिपादन केले. हवाई दल कमांडर्सच्या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन नवी दिल्ली येथे २६ ऑक्टोबर २०२३ रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) कार्यसज्जतेबाबत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी सत्रादरम्यान...27 Oct 2023 / No Comment /

हवाई संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यावर भर द्या

हवाई संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यावर भर द्यानवी दिल्ली, (२६ ऑक्टोबर) – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी भारतीय हवाई दलाच्या कमांडर्सशी चर्चा केली. यावेळी त्यांनी झपाट्याने बदलणारी भू-राजकीय परिस्थिती पाहता हवाई संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यावर हवाई दलावर भर दिला. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, या बदलत्या परिस्थितीत लष्कराला त्यांची ऑपरेशनल तयारी मजबूत ठेवावी लागेल. देशात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय हवाई दल कमांडर्स परिषदेला संबोधित करताना राजनाथ म्हणाले की, अधिकार्‍यांनी भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यावर आणि...26 Oct 2023 / No Comment /

भारतीय प्रजातीचे श्वान लवकरच पोलिस कर्तव्यावर

भारतीय प्रजातीचे श्वान लवकरच पोलिस कर्तव्यावर– गृह मंत्रालयाचा आदेश, नवी दिल्ली, (२३ ऑक्टोबर) – मुधोळ हाऊंड, रामपूर हाऊंड, गड्डी आणि बखरवाल या भारतीय प्रजातीच्या श्वानांना पोलिस श्वान म्हणून तैनात केले जाण्याची शक्यता आहे. त्यांचा वापर संशयित, अमली पदार्थ आणि स्फोटके शोधून काढण्यासाठी केला जाईल तसेच उच्च जोखीम असलेल्या भागात गस्त घालण्यात येईल, असे अधिकार्यांनी सांगितले. आतापर्यंत या कामासाठी परदेशी जातीचे श्वान ठेवले जात होते. केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफएस) जसे बीएसएफ, सीआरपीएफ आणि सीआयएसएफ पोलिस...23 Oct 2023 / No Comment /

राजनाथ सिंहाच्या हस्ते पहिल्या ’इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हल’चे उद्घाटन

राजनाथ सिंहाच्या हस्ते पहिल्या ’इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हल’चे उद्घाटन– राजनाथ सिंह यांचे लष्करी क्षेत्रातील प्राचीन सामरिक कौशल्ये दाखवण्यासाठी उद्भव प्रकल्प सुरू, नवी दिल्ली, (२१ ऑक्टोबर) – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी नवी दिल्लीतील मानेक्ष केंद्रात पहिल्या ’इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हल’चे उद्घाटन केले. लष्करी क्षेत्रातील प्राचीन धोरणात्मक कौशल्याद्वारे स्वदेशीकरणाला चालना देण्यासाठी त्यांनी ’उद्भव प्रकल्प’ सुरू केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या लष्करी प्रदर्शनाचीही संरक्षणमंत्र्यांनी पाहणी केली. या दोन दिवसीय कार्यक्रमामुळे देशातील तरुणांना प्रेरणा मिळेल, असे राजनाथ सिंह यांचे म्हणणे...21 Oct 2023 / No Comment /

पाकिस्तानी रेंजर्सचा एकतर्फी गोळीबार

पाकिस्तानी रेंजर्सचा एकतर्फी गोळीबारजम्मू, (१८ ऑक्टोबर) – जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सने केलेल्या एकतर्फी गोळीबारात सीमा सुरक्षा दल अर्थात् बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. अर्निया सेक्टरमधील विक्रम पोस्टवर मंगळवारी सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास पाकिस्तानी रेंजर्सने गोळीबार केला. त्यानंतर बीएसएफच्या जवानांनी या गोळीबाराला तेवढ्याच तीव‘तेने उत्तर दिले, असे बीएसएफने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले. या एकतर्फी गोळीबाराचा मुद्दा पाकिस्तान...18 Oct 2023 / No Comment /

‘उत्तम’, ‘अंगद’ या अद्ययावत प्रणाली हलक्या लढाऊ विमानात बसविणार

‘उत्तम’, ‘अंगद’ या अद्ययावत प्रणाली हलक्या लढाऊ विमानात बसविणारनवी दिल्ली, (१७ ऑक्टोबर) – भारतीय हवाई दलाच्या संपूर्ण स्वदेशी अशा मार्क-ए १ या हलक्या लढाऊ विमानांमध्ये ‘उत्तम’ आणि ‘अंगद’ या दोन नवीन अद्ययावत प्रणाली बसविण्यात येणार आहे. यामुळे ही विमाने नव्या ताकदीने शत्रूंचा सामना करण्यासाठी सज्ज असणार आहेत. ‘उत्तम’ हे रडार असून, ‘अंगद’ इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर संच आहे. या दोन्ही प्रणाली विकासाच्या अंतिम टप्प्यात आहेत. या प्रणाली लवकरच मार्क-ए १ या हलक्या लढाऊ विमानांमध्ये बसविल्या जातील, अशी माहिती संरक्षण अधिकार्यांनी...17 Oct 2023 / No Comment /

भारतीय हवाई दलाला मिळाला नवीन ध्वज

भारतीय हवाई दलाला मिळाला नवीन ध्वजप्रयागराज, (०८ ऑक्टोबर) – भारतीय हवाई दलाने आज आपला ९१ वा स्थापना दिवस साजरा केला. भारतातील ब्रिटिश राजवटीत ८ ऑक्टोबर १९३२ रोजी भारतीय हवाई दल ’रॉयल इंडियन एअर फोर्स’ म्हणून अस्तित्वात आले. या दिवशी हे दल भव्य परेड, आयएएफ जवानांचा सन्मान आणि देशभरात एअर शो आयोजित करते. या वर्षी, भारतीय वायुसेना दिनाची थीम ’आयएएफ – एअरपॉवर बियॉन्ड बाऊंडरीज’ ही होती, जी या दलाची उत्कृष्टता, नाविन्य आणि देशाच्या आकाशाचे संरक्षक म्हणून त्यांची...8 Oct 2023 / No Comment /