ए आर रहमान पुन्हा ऑस्करच्या शर्यतीत

=‘जल’ या चित्रपटाचेही नामांकन=
नवी दिल्ली, [१५ डिसेंबर] – राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘जल’ हा हिंदी चित्रपट आणि याआधी दोनवेळा ऑस्कर जिंकणारे ‘मद्रास मोझार्ट’ ए. आर. रहमान पुन्हा एकदा ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. संगीतकार ए. आर. रहमान यांना ‘बेस्ट ओरिजिनल स्कोअर’ या ११४ जणांच्या क्रमवारीत नामांकन मिळाले आहे.
‘जल’ हा दिग्दर्शक गिरीश मलिक यांचा पहिलाच चित्रपट आहे. रहमान यांना दोन हॉलीवूडपटातील संगीतासाठी हे नामांकन मिळाले आहे. ‘मिलियन डॉलर आर्म’ आणि ‘दि हंड्रेड फूट जर्नी’ या दोन चित्रपटांसाठी त्यांना हे नामांकन मिळाले आहे. याशिवाय, ‘कोच्चादेयान’ या रजनीकांतचा अभिनय आणि रहमानचेच संगीत असलेल्या चित्रपटालाही ‘बेस्ट ओरिजिनल स्कोअर’साठी नामांकन मिळाले आहे तर, ‘जल’ या चित्रपटाला ‘सर्वोत्तम चित्रपट’ आणि ‘बेस्ट ओरिजिनल स्कोअर’ अशा दोन्ही गटात नामांकन मिळाले आहे. ‘जल’ ही भारताकडून स्वतंत्रपणे पाठविलेली रचना असून, अधिकृतपणे पाठविलेला चित्रपट ‘लायर्स डायस’ हा आहे.
‘जल’ हा चित्रपट बक्का नावाच्या पात्राभोवती फिरतो. त्याच्याकडे वाळवंटात पाणी शोधण्याची क्षमता आहेे. ही भूमिका पूरब कोहलीने केली असून कीर्ति आणि तनिष्ठा चॅटर्जीने या चित्रपटात अभिनय केला आहे. हा चित्रपट ‘इंटरस्टेलर’,‘एक्झोड्स’ आणि ‘३०० राईज ऑफ एम्पायर’ या चित्रपटांसोबत स्पर्धेत आहे. ऑस्करसाठीची अंतिम क्रमवारी १५ जानेवारीला घोषित होणार असून पुरस्कार प्रदान सोहळा २२ फेब्रुवारीला होणार आहे.

on - सोमवार, १५ डिसेंबर, २०१४,
Filed under - कला भारती , ठळक बातम्या
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा