लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
वॉशिंग्टन, [७ फेब्रुवारी] – लाल द्राक्षे आणि शेंगदाणे यासारख्या सर्वसामान्य खाद्यपदार्थांमध्ये आढळून येणार्या घटकांमुळे वृद्धापकाळात स्मृतिभ्रंश होण्याचा धोका बर्याच प्रमाणात कमी करणे शक्य होऊ शकते, असा अभ्यासावर आधारित दावा अनिवासी भारतीय असलेल्या एका संशोधकाने केला आहे.
टेक्सासच्या ए ऍण्ड एम हेल्थ सायन्स सेंटर कॉलेज ऑफ मेडिसिन येथे प्राध्यापक असलेले अशोक शेट्टी सध्या लाल द्राक्ष्यांच्या सालपटात तसेच रेड वाईनमध्ये जे ऍण्टीऑक्सिडंट आढळून येतात, त्यापासून वृद्धापकाळात मानवाला काय फायदे मिळू शकतात, यावर अभ्यास करीत आहेत. सोबतच, शेंगदाणे आणि काही प्रकारच्या बेरीजमधील घटकांच्या परिणामांचाही ते अभ्यास करीत आहेत.
रेसव्हेराट्रोल अर्थात ऍण्टीऑक्सिडंटचा खरा उपयोग हृदयविकारावर आळा घालण्यासाठीच होत असतो. पण, शेट्टी आणि त्यांच्या चमूचा असा ठाम विश्वास आहे की, वृद्धापकाळात जर स्मृतिभ्रंश झाला असेल, तर मेंदूचा भाग असलेल्या हिपोकॅम्पसवरही त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
या पथकाने लाल द्राक्षे, रेड वाईन आणि शेंगदाण्यांमधील या घटकांचा उपयोग मनुष्यासोबतच प्राण्यांवरही केला. मध्यम वय उलटल्यानंतर स्मृतीवर जो परिणाम होतो, तो दूर करण्यात या घटकांची उपयुक्त मदत होत असल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे. या चमूने आपला अहवाल नुकताच एका जर्नलमध्ये प्रकाशित केला.

on - रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५,
Filed under - आरोग्यवर्धिनी , ठळक बातम्या , फिचर
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा