मोबाईलमध्ये हरपला घरातील संवाद

=महानायक अमिताभ बच्चन यांची खंत=
मुंबई, [४ मार्च] – एक काळ होता… घरातील सर्व सदस्य सायंकाळी एकत्र यायचे… दिवसभरातील घडामोडी, घटनांची माहिती एकमेकांना सांगायचे… कुणी आपले दु:ख, तर कुणी आनंदाचे क्षण कथन करायचे… पण, आज तो काळ राहिलेला नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. दिवसभराच्या कामावरून घरी आल्यानंतरही त्यांच्या हातात मोबाईल राहतो. या मोबाईलमुळे घरात पूर्वी होणारा संवाद आज कुठेतरी हरपला आहे, अशी खंत सहस्रकातील महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली आहे.
‘एसआरबच्चन डॉट कॉम’ या आपल्या ब्लॉगवर त्यांनी म्हटले आहे की, आजची पिढी ज्या गतीने स्वत:ला सादर करीत आहे, बोलत आहे, विचार करीत आहे, ते बघून खरोखरच संभ्रम निर्माण होत आहे. त्यांच्यासोबत ताळमेळ जमवून आणताना मला फार अडचणींचा सामना करावा लागत आहे. वृद्धांसाठी ही एक मोठी समस्याच आहे. कारण, या युवा पिढीला त्यांच्या भविष्यातील गरजा काय आहेत, याची परिपूर्ण माहिती आहे आणि त्यासाठी त्यांनी स्वत:ला तयारही केले आहे. घरातील वृद्ध मंडळींना तर त्यांनी निराश केले आहे.
घरात आल्यानंतर परिवारातील सदस्यांसोबत संवाद साधण्याऐवजी युवा पिढी आपल्या मोबाईल फोनवरच व्यस्त असते. नवनवीन संशोधनांना माझा विरोध नाही. पण, प्रत्येकानेच स्वत:वर प्रेम करायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.

on - गुरुवार, ५ मार्च, २०१५,
Filed under - कला भारती , ठळक बातम्या
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा