प्रशांत दामले यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

मुंबई, [२३ नोव्हेंबर] – ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना नाटक, चित्रपट व संगीत क्षेत्रातील आपल्या चतुरस्त्र कामगिरीबाबत दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
दामलेंच्या ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाच्या १०० व्या प्रयोगादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले हृदयनाथ मंगेशकर यांनी ही घोषणा केली. लता मंगेशकरांनी आपले वडील दीनानाथ मंगेशकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९९९ सालपासून या पुरस्काराची सुरुवात केली. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एप्रिल २०१६ मध्ये दीनानाथ मंगेशकरांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशांत दामले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.
नाट्यसृष्टीमधील एक आघाडीचे कलाकार म्हणून प्रशांत दामलेंना ओळखले जाते. तब्बल ३३ वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रात काम करीत असून आपल्या अभिनयाने त्यांनी आजवर रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. लहान वयातच त्यांचे नाव या पुरस्कारासाठी समोर आल्याने परीक्षकांसाठी (ज्यूरी) तो काहीसा वादाचा मुद्दा ठरला होता. मात्र दामलेंचा अभिनय आणि नाटकांप्रती असलेली त्यांची निष्ठा या दोन जमेच्या बाजू ठरल्याने त्यांची या पुरस्काराकरिता निवड करण्यात आली.
नाट्यक्षेत्रात अजरामर असलेली कट्यार काळजात घुसली ही कलाकृती त्यांच्या प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनद्वारे २५ वर्षांनी पुनरुज्जीवीत केली.

on - मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५,
Filed under - कला भारती , ठळक बातम्या
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा