सूर्यमालेत नववा ग्रह सापडल्याचा दावा?
न्युयॉर्क, [२१ जानेवारी] – सूर्यमालेतील प्लुटो या ग्रहाच्या पुढे असलेल्या गडद अंधारात विशाल बर्फाळ ग्रह असल्याचा दावा अमेरिकेच्या खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे. हा ग्रह प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाल्यास त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या १० पट असेल. याला त्यांनी ‘प्लॅनेट नाईन’ असे नाव दिले आहे.
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अंतराळ संशोधकांनी सूर्यमालेत नववा ग्रह असल्याची ही शक्यता व्यक्त केली आहे. पृथ्वीच्या तुलनेत हा ग्रह सुमारे ५ ते १० पटीने मोठा आहे. अंतराळ संशोधक मायकल ब्राऊन आणि कॉन्स्टॅटिन बॅटगीन यांनी या ग्रहाचा शोध लावला आहे. त्यांना याचे पुरावे सापडले. परंतु त्यांनी अद्याप हा ग्रह बघितलेला नाही. आपल्या सूर्यमालेतील डोर्फ ग्रहांच्या आणि लहान ऑब्जेक्टच्या स्थानांचा आणि गतीचा अभ्यास करत असताना दोघांना हा ग्रह आढळून आला. या ग्रहाचे निश्चित स्थान शोधून काढण्यासाठी येथील वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू आहेत.
शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, सूर्यमालेत आठवा ग्रह नेपच्यून सूर्याभोवती घालत असलेल्या प्रदक्षिणेच्या वीसपट अंतरावरून हा ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहे.

on - शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६,
Filed under - ठळक बातम्या , विज्ञान भारती
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा