आता सूर्यप्रकाशाने निघणार कपड्यांवरचे डाग

sunlight airing-clothesमेलबर्न, [२६ मार्च] – कपड्यांवरचे डाग काढून टाकण्यासाठी सध्या बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. काही कंपन्या नवीन तंत्रज्ञानाच्या वॉशिंग मशिन्स बनवून त्या कपड्यांवरचे डाग काढू शकत असल्याचा दावा करीत आहेत. यातच आता ऑस्ट्रेलियन संशोधकांनी नव्या प्रकारचे कापडच शोधून काढले आहे. या कापडावर लागलेले डाग केवळ सूर्यप्रकाशाने निघून जाणार आहेत.
सूर्यप्रकाशाचा आणि ऊर्जेचा वापर करून अनेक यंत्रे चालविली जातात आणि या नैसर्गिक ऊर्जास्रोताचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला जात आहे. सौर तंत्रज्ञानावर आधारित नॅनो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, संशोधकांनी हे नवीन कापड विकसित केले आहे. या कापडापासून तयार कपडे वापरल्यानंतर केवळ उन्हात वाळत टाकल्यास ते स्वच्छ होणार असल्याचा दावा संशोधकांच्या चमूने केला आहे. या चमूत एका भारतीय अभ्यासकाचाही समावेश आहे. कमी किमतीत तयार होणार्‍या या कापडाच्या निर्मितीसाठी नॅनोस्ट्रक्चरचा वापर करण्यात आला आहे. या कापडावर लागलेला डाग सूर्यप्रकाशाच्यासंपर्कात येताच नाहीसा होणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या आरएमआयटी विद्यापीठातील संशोधकांच्या या चमूने केलेल्या दाव्यानुसार, हे कपडे बल्बच्या उजेडात ठेवले तरी त्यावरचे डाग नाहिसे होणार आहेत. या कापडाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य असून त्यांचे स्ट्रक्चर थ्री डी असल्याची माहिती संशोधक राजेश रामनाथन यांनी दिली आहे. भविष्यात स्वत:हून स्वच्छ होणारे कपडे वापरात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कापडाची रचना तांबे आणि चांदीच्या नॅनोस्ट्रक्चरवर आधारित असून हे दोन्ही धातू त्यांच्या प्रकाश शोषून घेण्याच्या गुणधर्मासाठी ओळखले जातात. ‘ऍडव्हॉन्स्ड मटेरियल्स इंटरफेसेस’ या विज्ञानविषयक नियतकालिकात याविषयीचे संशोधन प्रकाशित झाले आहे.

✎ Edit

Posted by - Admin,
on - रविवार, २७ मार्च, २०१६,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS