चार धाम यात्रेसाठी अशी करा घरबसल्या नोंदणी
चारधाम यात्रेला जायचे असेल तर तुम्ही घरी बसून नोंदणी करू शकता, यासाठी तुम्हाला रांगेत उभे राहण्याचीही गरज भासणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम registrationandtouristcare.uk.gov.in या वेबसाइटला भेट द्या. त्यांनतर नोंदणी बटणावर क्लिक करा आणि लॉगिन फॉर्म भरा. तुमच्या मोबाईलवर मिळालेल्या ओटीपी द्वारे पडताळणी करा. डॅशबोर्डमध्ये प्रवासाशी संबंधित संपूर्ण तपशील प्रविष्ट करा. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, यात्रेकरूला नोंदणी क्रमांक असलेला एसएमएस प्राप्त होईल. चारधाम यात्रा सुरू करण्यासाठी भाविकांची फोटो मेट्रिक/बायोमेट्रिक नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाइन बुकिंगच्या वेळी प्रवाशांचा ओळखपत्र सादर करावा लागेल.

on - शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३,
Filed under - अध्यात्मिक , फिचर
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा