‘कांतारा २’चे शूटिंग सुरू

हैद्राबाद, (२४ मार्च) – कन्नड चित्रपट ‘कांतारा’ने रेकॉर्ड मोडून एक वेगळाच इतिहास रचला. सुरुवातीला फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नंतर हिंदी आणि इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले. अभिनेता दिग्दर्शक रिषभ शेट्टी आणि होमबाले फिल्म्सचे संस्थापक विजय किरगंदूर यांनी यानिमित्त जंगी सेलिब्रेशन केले होते. दरम्यान आता एका पोस्टमधून त्यांनी ‘कांतारा २’च्या लिखाणाला सुरुवात झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
यादरम्यान रिषभ शेट्टीने ‘कांतारा २’बद्दल भाष्य केलं. ‘कांतारा २’ हा मूळ चित्रपटाचा प्रीक्वल असणार आहे असं रिषभने नमूद केलं. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटी एवढी कमाई केली. आता पुढील वर्षी येणाऱ्या ‘कांतारा २’साठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा