सीआरपीएफच्या १.३० लाख जागांची मेगाभरती

नवी दिल्ली, (१३ एप्रिल) – केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी करत केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या जवळपास १ लाख ३० हजार रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे जाहीर केले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात थेट भरतीद्वारे लेव्हल ३ ची पदे भरली जाणार आहेत. मंत्रालयाने जारी केलेल्या अधीसूचनेनुसार, सीआरपीएफमध्ये जीडी कॉन्स्टेबलची एकूण १ लाख २९ हजार ९२९ भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेतील एकूण जागांपैकी १ लाख २५ हजार २६२ पदे पुरुष उमेदवारांसाठी तर ४,४६७ पदे महिला उमेदवारांसाठी असणार आहेत. त्याचप्रमाणे कॉन्स्टेबल पदाच्या भरतीमधील १० टक्के रिक्त जागा या माजी अग्निवीरांसाठी राखीव असणार आहेत. या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवार हा कोणत्याही बोर्डातून १० वी पास झालेला अथवा त्याच्या समकक्ष शिक्षण घेतलेला असावा. पात्र उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी, मेडिकल टेस्ट आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल. अधिकृत अधिसूचनेमध्ये अर्ज प्रक्रियेच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. मात्र, मंत्रालयाकडून सीआरपीएफ भरतीच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. या भरतीसाठीची अधिकची आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी उमेदवरांनी सीआरपीएफ च्या https://rect.crpf.gov.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्यावी.

on - गुरुवार, १३ एप्रिल, २०२३,
Filed under - युवा भारती
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा