’पुष्पा २’; शोध लवकर संपेल!

हैद्राबाद, (०५ एप्रिल) – अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा २’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी अल्लूने पुष्पा या चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले होते. अशा परिस्थितीत आता सर्वजण अल्लू अर्जुनच्या मोस्ट अवेटेड चित्रपट ’पुष्पा २’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता ’पुष्पा-द रुल’बाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. वास्तविक, चित्रपट निर्मात्यांनी ट्विटरवर ’पुष्पा २’ बद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहायला मिळत आहे.
२० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये ’पुष्पा’ तिरुपती तुरुंगातून पळून गेल्याचे दाखवण्यात आले आहे. तो आता कुठे आहे, त्याचा पत्ता ७ एप्रिलला दुपारी ४ वाजता कळेल. ’शोध लवकर संपेल’ असे टीझरसोबत लिहिले आहे. अल्लू अर्जुन आणि ’पुष्पा द रुल’ सोशल मीडियावर टॉपवर ट्रेंड करत आहेत. या व्हिडिओनंतर चाहत्यांमध्ये पुष्पा २ बद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्पा २ च्या स्टार कास्टमध्ये काही मोठ्या नावांचा समावेश करणार आहेत. या यादीत बॉलिवूडच्या सुपरस्टार्सच्या नावांचा समावेश आहे. या यादीत सलमान खानव आणि अजय देवगण यांची नावे पुढे आली आहेत. मात्र, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पुष्पा या चित्रपटाने पडद्यावरचे सर्व विक्रम मोडीत काढले. या चित्रपटातील गाण्यांपासून ते अॅक्शन सीन आणि डायलॉग्सपर्यंत सर्व काही थक्क करणारे होते. लोक आजपर्यंत या चित्रपटाचे डायलॉग रिपीट करत आहेत. पुष्पाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाचे बजेट २००-२५० कोटी होते. त्याचवेळी पुष्पा २ चे बजेट ३५० कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा