डाळींच्या दरात वाढ, आता वरण महागणार!

Dals
Dals

मुंबई, (२३ मे) – डाळ ही अशी एक गोष्ट आहे, जी प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये दररोज शिजवली जाते. परंतु सध्या डाळींच्या वाढत्या किमती पाहता लवकरच ही डाळ स्वयंपाकघरातून गायब तर होणार नाही ना अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे. खरे तर एप्रिल महिन्यापर्यंत डाळींच्या किमतींवर सरकारने नियंत्रण ठेवले होते. आता मे महिन्यामध्ये डाळींच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होत आहे. ग्राहक विभागाची आकडेवारी पाहता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जर अशीच या आकडेवारींमध्ये वाढ होत गेली तर स्वयंपाकघरातून डाळ नक्कीच गायब होईल.
ग्राहकविषयक विभागाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यामध्ये तुरीच्या डाळींची सरासरी किंमत ११६.६८ रुपये होती. आता १८ मे रोजी समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही वाढून ११८.९८ रुपये इतकी झाली आहे. मध्यमवर्गीय लोकांना याचा सर्वात जास्त फटका बसेल. कारण त्यांचा महिन्याचा खर्च हा ठरलेला असतो. त्यामुळे महागाईमुळे त्यांचा हा खर्च बिघडण्याची शक्यता आहे.
आणखी कोणत्या डाळींच्या किमती वाढल्या?
मे महिन्यात फक्त तुरीच्या डाळीच्या किमतीत वाढ नाही झाली तर मूग डाळ, उडीद आणि चण्याच्या डाळीच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. मूग डाळीच्या किमतीविषयी सांगायचे झाले तर, १८ मे दरम्यान डाळींच्या किमतीमध्ये १०७.२९ रुपये ते १०८.४१ रुपयांची वाढ झाली आहे. तर उडीद डाळीच्या किमतीत १०८.२३ रुपये ते १०९.४४ रुपयांची वाढ झाली आहे. चण्याच्या डाळीच्या किमतीत ७३.७१ रुपये ते ७४.२३ रुपयांची वाढ झाली आहे.

✎ Edit

Posted by - Admin,
on - मंगळवार, २३ मे, २०२३,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS