नवरात्रीच्या आधी भंगलेल्या, तुटलेल्या वस्तू घरातून टाका काढून
भंगलेल्या, तुटलेल्या मूर्ती
कोणत्याही देवाची भंगलेली कींवा तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये. हे शुभ मानले जात नाही. तुमच्या घरामध्ये भंगलेल्या मूर्ती असतील तर शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी त्या घरातून काढून पवित्र नदीत विसर्जित कराव्यात.
जुने जोडे आणि चप्पल
तुमच्या घरात जुने शूज आणि चप्पल पडलेले असतील, जे तुम्ही वापरत नसाल तर नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून काढून टाका. वास्तु तज्ज्ञांच्या मते जुने शूज आणि चप्पल घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते.
बंद घड्याळ
घरात बंद घड्याळ ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते आणि घरात नकारात्मकता वाढते. त्यामुळे नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातील बंद घड्याळ आणि इतर अनावश्यक वस्तू काढून टाका.
फुटलेल्या काच
तुटलेला काच किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, त्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते. त्यामुळे नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील काचेच्या तुटलेल्या वस्तू काढून टाका.
फाटलेली धार्मिक पुस्तके
वास्तुशास्त्रानुसार फाटलेली धार्मिक पुस्तके कधीही घरात ठेवू नयेत. कोणताही धार्मिक ग्रंथ फाटला असेल तर ते नवरात्रीच्या आधी वाहत्या पाण्यात विसर्जित करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा