साऊथचा प्रसिद्ध सुपरस्टार सूर्या गंभीर जखमी

– चेन्नईमध्ये कांगुवा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कॅमेरा सूर्याच्या अंगावर पडला,
मुंबई, (२३ नोव्हेंबर) – साऊथचा प्रसिद्ध सुपरस्टार सूर्या शिवकुमारबाबत मोठी बातमी येत आहे. सूर्याचा अपघात झाला आहे. शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर फिल्म युनिटला तात्काळ अलर्ट करण्यात आले. सध्या त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आजकाल सूर्या त्याच्या आगामी ’कांगुवा’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
तामिळ अभिनेता सूर्या गंभीर जखमी झाला आहे. चेन्नईमध्ये कांगुवा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा अपघात घडला.रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान एक सीन चित्रित करत असताना कॅमेरा सूर्यावर पडला. त्यामुळे त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, तो सध्या रुग्णालयात दाखल आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारची बातमी मिळालेली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा