अजित पवार गटाकडून राज्यसभा उमेदवारांचे नाव जाहीर
मुंबई, (१४ फेब्रुवारी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने बुधवारी (१४ फेब्रुवारी) प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेचे उमेदवार बनवण्याची घोषणा केली आहे. अजित पवार गटाने पुन्हा एकदा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केला असून त्यांना वरिष्ठ सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारी आहे. अजित पवार गटाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या एक दिवस आधी उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.
बंडखोरीनंतर प्रफुल्ल पटेल अजित पवार गटासोबत गेले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांपैकी प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश त्या नेत्यांमध्ये आहे जे गेल्या वर्षी राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार गटाऐवजी अजित पवार गटात गेले होते. प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रातील पूर्वीच्या यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालयासारखे मोठे मंत्रालयही राष्ट्रवादीच्या कोट्यातून सांभाळले आहे. अलीकडेच, भारताच्या निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला ’खरा’ राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली आहे. आयोगाने अजित गटाला पक्षाचे चिन्ह ’घड्याळ’ही दिले होते. तब्बल ६ महिन्यांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा विजय मिळाला. या प्रकरणावर आयोगात १० सुनावणी झाली, त्यानंतर हा निर्णय देण्यात आला.
आयोगाच्या निर्णयावर महाविकास आघाडीने टीका केली होती. निर्णय देताना निवडणूक आयोगाने हेही स्पष्ट केले होते की, या निर्णयावर कोणाला काही आक्षेप असेल तर तो कोर्टात जाऊ शकतो. मात्र, महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्यावर जोरदार टीकाही केली होती.

on - गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा