दोन दिवसांत जागा वाटप जाहीर करा: मविआ नेत्यांना वंचितचे पत्र
लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस तसेच दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील जागावाटप जाहीर झाले. मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील जागावाटप अद्याप रखडले आहे. या पृष्ठभूमीवर वांचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर आणि प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांच्या सहीने आघाडीच्या नेत्यांना पत्र पाठविण्यात आले.
२२ फेब्रुवारीच्या पत्रपरिषदेत चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये ३९ जागांवर एकमत झाले असून, लवकरच २७ किंवा २८ फेब्रुवारीला औपचारिक आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे आम्हाला आतापर्यंत अंतिम झालेल्या जागा वाटपासंदर्भात माहिती द्यावी. २ फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या तीन पक्षाच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीतही आम्ही हीच विनंती केली होती. आघाडीकडून वंचितला तीन पक्षांमध्ये झालेल्या जागा वाटपाची माहिती मिळाल्यास तीन पक्षांना वैयक्तिकरीत्या किती जागा लढवण्यासाठी दिलेल्या आहेत, ते समजण्यात मदत होईल. त्यामुळे त्या संबंधित पक्षासोबत वंचित बहुजन आघाडी काही जागांसाठी वाटाघाटी करू शकेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

on - रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा