अमेरिकेतील भाजपाचे मित्र प्रचारासाठी करणार २५ लाख कॉल
वॉशिंग्टन, (०८ फेब्रुवारी) – अमेरिकेतील ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपा’ने भारतभरातील लोकांना २५ लाखांहून अधिक कॉल करून त्यांना मतदान करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पुन्हा निवडून देण्याचे आवाहन करण्याची एक विस्तृत योजना आखली आहे.
अमेरिकेतील ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ ने तीन हजारांवर भारतीय अमेरिकन लोकांचे एक मजबूत शिष्टमंडळ पाठविण्याची योजना आखली आहे. हे शिष्टमंडळ देशभर विविध क्षमतांमध्ये पक्ष व त्यांच्या उमेदवारांसाठी प्रचार करतील.
भाजपाने विशिष्ट कॉल करण्यासाठी विविध राज्याच्या भाषांनुसार धोरणे विकसित करण्यात मदत करण्यासाठी संपूर्ण अमेरिकेत दोन डझनहून अधिक संघ तयार केले आहेत.
आम्ही डिसेंबरपासूनच तयारी सुरू केली व या महिन्यात आम्ही वेग घेत आहोत. फेब्रुवारी मध्ये आम्ही संपूर्ण अमेरिकेत प्रचार मोहीम शुभारंभ कार्यक‘म घेणार आहोत. १८ राज्यांमधील सुमारे २०-२२ शहरात हा कार्यक‘म होणार आहे. आम्ही केवळ ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’चे सहानुभूतीदार आणि स्वयंसेवकच नाही तर सर्वसामान्य समुदाय, समाजाचे नेते आणि मोदी ३.० पाहू इच्छिणार्या समाजालाही एकत्र करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे ते त्यात सहभागी होतील, असे ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ अमेरिकाचे अध्यक्ष अडापा प्रसाद यांनी अलिकडील मुलाखतीत वृत्तसंस्थेला सांगितले.
मोदी सरकारची गत पाच वर्षांतील आणि १० वर्षांची कामगिरी एकत्रितपणे सादर करणार आहे. सद्यस्थितीत जागतिक समुदायात भारताचे स्थान कसे आहे तसेच अमेरिका-भारत संबंध आणि देशांतर्गत स्थिती अशी एकूण प्रगती कशी झाली, याविषयीच्या पॉवरपॉईंट स्लाईड्स आधीच तयार करण्यात आल्या आहेत व त्याच्या पीडीएफ पत्रकेही वितरित करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ अमेरिकेतील शहरांमध्ये चाय पे चर्चा आयोजित करणार आहे. आम्ही स्थानिक लोकांना एकत्र करू. भाजपा व मोदींच्या सर्वांगीण विकासाच्या कार्यक‘माबद्दल चर्चा करणार आहोत. आम्ही आमच्या सर्व अनिवासी भारतीय बांधवांना, मित्रांना आणि कुटुंबीयांना भाजपाला मत देण्यासाठी आवाहन करू. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना ४०० जागा मिळवून देण्याचे लक्ष्य आहे, असे ते म्हणाले.

on - गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४,
Filed under - अमेरिका , आंतरराष्ट्रीय , छायादालन
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा