पाकिस्तानी मुद्दाम देश सोडून पळून जातायत?
नवी दिल्ली, (११ मार्च) – पीआयए अर्थात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या महिला पदाधिकारी बेपत्ता होऊ लागल्या आहेत. या क्रू सदस्य पीआयएच्या फ्लाईटसोबत दुसर्या देशात विशेषत: कॅनडामध्ये जातात आणि मग बेपत्ता होतात. अलिकडेच, एक महिला कर्मचारी बेपत्ता झाली आणि तिच्या सामानात अधिकार्यांना ‘थँक यू पीआयए’ अशी चिठ्ठी लिहिलेली सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळखोर पाकिस्तानमधून पळून जाण्यासाठी पीआयए आपल्या कर्मचार्यांना मदत करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पीआयएची केबिन क्रू मरियम रजा हिने आपल्या नियमित ड्युटीनुसार, कॅनडातील टोरंटो इथे दाखल झाली.
विमानाच्या लॅण्डींगनंतर मरियम बेपत्ता झाली. तिच्या सामानात कंपनीच्या नावाने धन्यवाद लिहिलेली चिठ्ठी सापडली. याआधी जानेवारीत एक आणि त्याआधी गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात ७ कर्मचारी बेपत्ता झाल्या होत्या. या महिलांनी कॅनडामध्ये शरण घेतली असल्याचे नंतर स्पष्ट झाले. पाकिस्तानची आर्थिक दिवाळखोरी, खाद्यसामुग्रीची अनुपलब्धता, रखडलेला विकास आणि वेगाने वाढणारी गरीबी शिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची डागाळलेली प्रतिमा या कारणांमुळे पाकिस्तानचे नागरिक विशेषत: युवा देश सोडून जात आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल आठ लाख लोकांनी पाकिस्तानातून पलायन केले आहे. पण, प्रत्यक्षात हे आकडेवारी १० लाखांवर असल्याचा अंदाज आहे. पीआएसारख्या छुप्या मार्गांनी आणि कायदेशीर प्रक्रीया पूर्ण न करता पलायन करणार्यांचा आकडा नक्कीच मोठा असल्याचे सूत्रांचे मत आहे.
पीआयएच्या माध्यमातून पलायन करणार्यांमध्ये महिलांसोबतच पुरुषांचाही समावेश आहे. यामागचे प्रमुख कारण कॅनडाचं आश्रितांसाठीचे सोपं धोरण आहे. त्यासाठी, फक्त व्यक्तिश: कॅनडात उपस्थित राहणे, आपला मूळ देश सोडण्यामागची ठोस कारणे असणं, मूळ देशात जीवाला धोका असणे, देशात युद्धाची स्थिती असणे, उपासमारी असणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे उध्वस्त असणे एवढ्यावर कॅनडामध्ये आश्रय मिळू शकतो. वृत्तानुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स आपल्या कर्मचार्यांना थांबविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशा कर्मचार्यांना मिळणार्या सर्व सेवा आणि पगार वगैरे थांबविले जातात. शिवाय, कर्मचार्यांचे पासपोर्ट वगैरे कागदपत्रे कंपनी स्वत:कडे जमा करून ठेवत असल्याचे वृत्त आहे.

on - सोमवार, ११ मार्च, २०२४,
Filed under - आंतरराष्ट्रीय , आशिया
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा