निवडणूक रोखे: तृणमूलने टाकले काँग्रेसला मागे!

– सर्वाधिक निधी भाजपाला,

नवी दिल्ली, (१८ मार्च) – सर्वोच्च न्यायालयाने सीलबंद कव्हरमध्ये दिलेला निवडणूक रोख्यांचा नवा तपशील निवडणूक आयोगाने रविवारी आपल्या संकेतस्थळावर टाकला. यामध्ये विविध पक्षांना निधीसंदर्भातील डेटा असल्याचे आयोगाने म्हटले. सर्वाधिक निधी भाजपाला मिळाल्याचे स्पष्ट झाले. दुस्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेस आणि तिस्या क्रमांकाचा निधी काँग्रेस पक्षाला मिळाला आहे.
निवडणूक रोखे खरेदीत लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांची फ्युचर गेमिंग कंपनी टॉपर असल्याचे समोर आले आहे. कंपनीने १,३६८ कोटींचे रोखे खरेदी केले आहे. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षासाठी कंपनीने ५०९ कोटींचे सर्वाधिक रोखे खरेदी केले. नवीन माहितीमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षातील रोख्यांची माहितीचा समावेश आहे. कुठल्या पक्षाने किती निवडणूक रोखे वटवले याबाबत आयोगाने माहिती जारी केली.
प्रत्येक क्रेडिटच्या तारखेची माहिती उपलब्ध
१४ मार्च रोजी, आयोगाने ७६३ पानांच्या दोन सूचींमध्ये एप्रिल २०१९ नंतर खरेदी केलेल्या निवडणूक रोख्याची माहिती संकतस्थळावर जाहीर केली होती. त्यात पक्षनिहाय तपशील व बँक खात्यांचा समावेश नव्हता. नव्या माहितीत प्रत्येक रोख्याच्या रकमेचा संपूर्ण तपशील, प्रत्येक रोख्यावर मिळालेल्या क्रेडिटचा तपशील यासह ज्या बँक खात्यातून रक्कम जमा झाली त्याची माहिती तसेच प्रत्येक क्रेडिटच्या तारखेची माहिती आहे. याशिवाय कोणत्या पक्षाने रोखे वटवून किती निधी मिळविला याची माहिती देण्यात आली आहे. १२ एप्रिल २०१९ पासून २४ जानेवारी २०२४ पर्यंतची ही माहिती आहे. त्यात एक लाख, १० लाख आणि एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचे व्यवहार झाले आहे.
कुठल्या पक्षाला किती निधी
मेघा इंजीनियरिंग दुसर्‍या स्थानी
जदएस पक्षाला रोख्यांतून ८९.७५ कोटी मिळाले. या पक्षासाठी मेघा इंजीनियरिंगने ५० कोटींचे रोखे खरेदी केले. द्रमुक पक्षासाठी याच कंपनीने १०५ कोटींचे रोखे घेतले. ही कंपनी रोखे खरेदीत दुस्या स्थानावर आहे. इंडिया सिमेंट १४ कोटी, सन टीव्हीने १०० कोटींचे रोखे खरेदी केले. शिवसेना ६०.४ कोटी, राजदला ५६ कोटी रुपयांचा निधी रोख्यांच्या माध्यमातून मिळाला. सीपीआयएम, एआयएमआयएम व बसपासाठी रोखे खरेदी झाली नाही.
पक्ष आकडा रुपयांत
भाजपा ६,९८६.५ कोटी
तृणमूल काँग्रेस १,३८७ कोटी
काँग्रेस १,३३४.३५ कोटी
डीएमके ६,५६.५ कोटी
बिजू जनता दल ९,४४.५ कोटी
वायएसआर काँग्रेस ४४२.२ कोटी
तेदेपा १८१.३५ कोटी
बीआरएस १३२२ कोटी
सपा १४.०५ कोटी
अकाली दल ७.२६ कोटी
अण्णाद्रमुक ६.०५ कोटी
नॅशनल कॉन्फरन्स ५० लाख

✎ Edit

Posted by - Admin,
on - मंगळवार, १९ मार्च, २०२४,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS