हा अभियांत्रिकीचा चमत्कार! : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई, (११ मार्च) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. पहिल्या टप्प्यात कोस्टल रोड मरीन ड्राइव्ह ते दक्षिण मुंबईतील वरळीला जोडणार आहे. साडे दहा किलोमीटर लांबीचा हा मार्ग आज सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याचे कौतुक करत हा अभियांत्रिकीचा चमत्कार असल्याचे म्हटले. अधिकार्यांनी सांगितले की, कार चालक वरळी सीफेस आणि हाजी अली इंटरचेंज, आमर्सन इंटरचेंज येथून कोस्टल रोडमध्ये प्रवेश करू शकतात आणि मरीन लाइन्सच्या रस्त्यावरून बाहेर पडू शकतात.
या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही उपस्थिती होती. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी कोस्टल रोडवरून बेस्टच्या इलेक्ट्रिक बसला हिरवी झेंडी दाखवली. विंटेज कार रॅलीलाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या प्रकल्पाची किंमत १२,७२१ कोटी रुपये आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचे काम १३ ऑक्टोबर २०१८ रोजी सुरू झाले. या प्रकल्पांतर्गत अनेक एकरांवर पसरलेले सेंट्रल पार्कही बांधले जात आहे. या रस्त्याला ’धर्मवीर संभाजी महाराज कोस्टल रोड’ असे नाव देण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. वरळीत कोस्टल रोडजवळ संभाजी महाराजांचा पुतळाही बसवण्यात येणार आहे. हा रस्ता अभियांत्रिकीचा चमत्कार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा रस्ता तयार करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या प्रकल्पाचा दुसरा टप्पा मे महिन्यात सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या अंतर्गत हा रस्ता वांद्रे-वरळी सी लिंक तसेच दहिसरला जोडेल. या ५३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यामुळे इंधन आणि वेळेची मोठी बचत होणार असून प्रदूषणही कमी होणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत १७५ एकर हिरवळीचा परिसर विकसित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मुंबईला ३०० एकरचे सेंट्रल पार्कही मिळणार आहे. नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागील सरकारवर निशाणा साधला आणि मागील सरकारच्या काळात प्रकल्पाचे काम मंदावली असल्याचा आरोप केला.

on - सोमवार, ११ मार्च, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा