भारतातील उत्पादन क्षेत्र सुसाट

– विक्रीने गाठला मागील ५ महिन्यांचा उच्चांक,
नवी दिल्ली, (०१ मार्च) – देशांतर्गत व जागतिक मागणीत झालेल्या वाढीचा सकारात्मक परिणाम उत्पादन क्षेत्रावर दिसून आला आहे. फेब्रुवारी महिन्यात उत्पादन क्षेत्राच्या विक्रीने मागील पाच महिन्यांचा उच्चांक गाठल्याचे मासिक सर्वेक्षणात दिसून आले आहे. एचएसबीसीच्या सर्व्हेनुसार, इंडिया मॅन्यूफॅक्चरिंग पर्चेसिंग इंडेक्स (पीएमआय) ५६.५ वरून ५६.९ वर पोहोचला आहे. सप्टेंबर २०२३ नंतर उत्पादन क्षेत्रात पहिल्यांदाच ही वाढ नोंदविण्यात आली आहे.
आरोग्य क्षेत्रासाठी वापरण्यात येणार्या यंत्रसामग्रीच्या विक्रीत सर्वाधिक वाढ नोंदवल्याचे अहवालात म्हटले आहे. पर्चेसिंग मॅनेजर्स निर्देशांक ५० च्यावर असल्यास उत्पादन क्षेत्र तेजीत असल्याचे मानल्या जाते. सर्वेक्षणानुसार, फेब्रुवारी महिन्यात उत्पादन क्षेत्रातील वस्तूंची निर्यात झपाट्याने वाढली आहे. सप्टेंबर २०२३ पासून पहिल्यांदाच जागतिक मागणी उच्चांकावर आहे. मागील २१ महिन्यांनंतर फेब्रुवारीत उत्पादन क्षेत्रातील निर्यातीत सर्वाधिक वाढीची नोंद झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा