महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यांमध्ये निवडणूक
नवी दिल्ली, (१६ मार्च) – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून, महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघामध्ये मतदान होईल. या जागांसाठीची अधिसूचना २० मार्च रोजी जारी होईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक २७ मार्च रोजी असून, अर्जांची छाननी २८ मार्च रोजी पूर्ण होईल. तर, ३० मार्च रोजीपर्यंत उमेदवार आपले नामांकन अर्ज मागे घेऊ शकतील. या मतदारसंघांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
दुसर्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी मतदारसंघांमध्ये निवडणूक होईल. या निवडणुकीची अधिसूचना २८ मार्च रोजी जारी होईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक ४ एप्रिल रोजी असून, अर्जांची छाननी ५ एप्रिल रोजी पूर्ण होईल. तर, ८ एप्रिल रोजीपर्यंत उमेदवार आपले नामांकन अर्ज मागे घेऊ शकतील. या मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
तिसर्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, मढ, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना १२ एप्रिल रोजी जारी होईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक १९ एप्रिल रोजी असून, अर्जांची छाननी २० एप्रिल मार्च रोजी पूर्ण होईल. तर, २२ एप्रिल रोजीपर्यंत उमेदवार आपले नामांकन अर्ज मागे घेऊ शकतील. या मतदारसंघांमध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे.
चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून पाचव्या टप्प्यात २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. देशभरात सर्वत्र ४ जून रोजी मतमोजणी होणार असून, ६ जूनपूर्वी लोकसभा निवडणुकीची प्रक्रीया पूर्ण होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.

on - शनिवार, १६ मार्च, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा