हिंसाचाराची एसआयटी चौकशी करण्याचा विधानसभाध्यक्षांचा आदेश
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी सभागृहाचे कामाकज सुरू होताच, भाजपाचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी माहितीच्या मुद्याद्वारे सदर विषय उपस्थित केला. ते म्हणाले, महाराष्ट्र बेचिराख करण्याचे कोणी ठरवले, या षडयंत्राची योजना पहिलेच ठरली होती काय, ही धमकी आहे काय, असे धमकी देण्यामागची भूमिका काय, हे कोणाचे कटकारस्थान आहे, या सर्व गोष्टींची शहानिशा झाली पाहिजे.
या हिंसाचाराचा बोलवता धनी कोण आहे, आंदोलन कुणी पेटवले, जरांगेंचा कोणत्या नेत्याशी संबंध आहे, कुठल्या नेत्यासोबत यांचा फोटो आहे, या सर्व गोष्टीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी अॅड. शेलारांनी केली. त्यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचा आदेश दिला.

on - रविवार, ३ मार्च, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा