निवडणुकीच्या एक दिवस आधीपर्यंत सुरू राहणार नावनोंदणी

– मतदारांनी नोंदणीसाठी पुढे यावे,

नागपूर, (१८ मार्च) – मतदार आयोगाच्या पत्रकार परिषदेसोबतच देशभरात लोकसभा निवडणूक २०२४ चा बिगुल वाजला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रशासन जोरकसपणे, या सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहे. खरे तर निवडणूक आयोगाच्या वतीने कित्येक महिने आधीपासून नवमतदारांसोबतच स्थान बदल किंवा इतर बदलांसह नावनोंदणी करण्याची मोहिम निवडणूक आयोगाने राबविली होती. तेव्हा ही संधी निसटलेले सर्व मतदार आता नावनोंदणी करू शकतील.
नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना डॉ. इटनकर म्हणाले की, यामध्ये नववधू म्हणून इतर गावी गेलेल्या युवती, वयाची १८ वर्षे नुकतीच पूर्ण करणारे युवक-युवती, नोकरीसाठी स्थलांतर केलेले किंवा अन्य कोणत्याही कारणाने नावनोंदणी न झालेल्या किंवा त्यात बदल असलेल्या व्यक्ती मतदार यादीत नावनोंदणी करू शकतील, अशी माहिती डॉ. इटनकर यांनी दिली.
https://voters.eci.gov.in/. या संकेतस्थळावर संपर्क साधून मतदारांनी नावनोंदणी करवून घ्यायची आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच ८५ पेक्षा जास्त वयोगटातील, ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक दिव्यांग नागरिकांसाठी घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, घरातून मतदान करताना राजकीय पक्ष आणि निवडणुकीतील उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असतील. मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. यातून या सुविधेची पारदर्शकता जपली जाणार आहे, असेही डॉ. इटनकर यांनी स्पष्ट केले.
‘अ‍ॅप’च्या माध्यमातून दुरुस्तीही करता येणार
नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व इतर निवडणूकविषयक सुविधा मिळविण्यासाठी वोटर हेल्पलाईन अ‍ॅप उपयुक्त आहे. निवडणूक आयोगाने तयार केलेले अ‍ॅप डाउनलोड करून घ्यावे. कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता अ‍ॅपच्या मदतीने नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करणे शक्य आहे..अथवा अस्तित्वात असलेल्या मतदार यादीतील नावात दुरुस्ती व छायाचित्रात बदलही करता येतो. मृत मतदाराचे नाव नातेवाईक वगळू शकतात.‌ तसेच, घरपोच मोफत मतदान ओळखपत्रही मिळविता येणार आहे. गुगल प्ले स्टोअरवरील https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen या लिंकच्या माध्यमातून हे अ‍ॅप डाउनलोड करून या सुविधेचा लाभ घेता येईल.
वेळ गेली नाही पण, घाई करा!
मतदारयादीत नाव येण्यासाठी २७ मार्च ही अंतिम तिथी आहे. तोपर्यंत नावनोंदणी आणि बदल करता येणार आहेत. मात्र, असे असले तरी २५ मार्चपर्यंत हे बदल केल्यास मतदार यादीत नावनोंदणी करणं प्रशासनासाठी सोयीचं तर मतदानाच्या दिवशी यादीत नाव शोधणं मतदारांसाठी सोपं होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बिपीन इटनकर यांनी तभा प्रतिनिधीला दिली.

✎ Edit

Posted by - Admin,
on - मंगळवार, १९ मार्च, २०२४,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS