टीएमसी म्हणजे- ‘तू मै और करप्शन’ : पंतप्रधान मोदी

Narendra Modi Solapur

कृष्णनगर, (०२ मार्च) – तृणमूल काँग्रेस पार्टी अर्थात् टीएमसी म्हणजे- ‘तू मै और करप्शन’ आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नाडिया जिल्ह्यातील कृष्णनगर येथे झालेल्या सभेला संबोधित करताना केला. तृणमूल काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर टीका करताना त्यांनी पश्चिम बंगालमधून भाजपाला लोकसभेच्या ४२ जागा जिंकवून देण्याचे आवाहन पक्ष कार्यकर्त्यांना केले. येथे मोठ्या प्रमाणावर गोळा झालेल्या नागरिकांमुळे मला ‘एनडीए सरकार, ४०० पार’ हा नारा देण्यास बळ मिळाले असल्याचे मोदी यांनी सांगितले.
अत्याचार, घराणेशाहीचे राजकारण आणि विश्वासघाताला तृणमूल काँग्रेस हा समानार्थी शब्द आहे. राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करीत आहे, त्यामुळे पश्चिम बंगालचे लोक निराश झाले आहेत. या राज्यात महिलांनी तृणमूलच्या नेत्यांवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. अशा परिस्थितीत माय-बहिणींना आधार देण्याऐवजी राज्य सरकार आरोपींची बाजू घेत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी संदेशखाली येथील प्रकरणाचा संदर्भ देताना सांगितले.
न्याय द्या अशी विनंती माय-भगिनी करीत राहिल्या. मात्र, तृणमूल सरकारने त्यांचे ऐकले नाही. त्यांनी ‘माँ, माटी, मनुष’च्या नावाने मते माागितली. आता बंगालमधील माय-भगिनी रडत आहेत. आपल्याला अटक कधी व्हावी, याचा निर्णयही गुन्हेगार घेत आहेत, इतपत राज्यातील परिस्थिती खराब झाली असल्याची टीका मोदी यांनी केली.
१५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील १५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पांमुळे बंगालचा आर्थिक विकास आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असे मोदी यांनी सांगितले. या व्यतिरिक्त त्यांच्या हस्ते पुरुलिया जिल्ह्यातील दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या रघुनाथपूर औष्णिक वीज प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले.

✎ Edit

Posted by - Admin,
on - रविवार, ३ मार्च, २०२४,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS