ईव्हीएमविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
नवी दिल्ली, (१६ मार्च) – ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सच्या कामकाजात प्रचंड अनियमितता असल्याचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. प्रत्येक गोष्टीत काही प्रमाणात कमी-जास्त घटक असतात, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. या मुद्यावर आतापर्यंत दाखल झालेल्या अनेक याचिकांवर आम्ही वेळोवेळी निकाल दिला आहे. आम्ही ईव्हीएमचे कार्यही अभ्यासले आहे, असे न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या न्यायासनाने आपल्या निकालात स्पष्ट केले.
एकाच मुद्यावर किती याचिका दाखल होणार आहे आणि आम्ही किती याचिकांवर सुनावणी करणार आहोत. अलिकडेच आम्ही व्हीव्हीपॅटशी संबंधित याचिकेवर सुनावणी केली. आम्हाला कोणतेही भाकीत वर्तवायचे नाही. प्रत्येक गोष्टीत काही तरी कमी-जास्त असतेच. त्यामुळे आम्ही तुमच्या याचिकेवर सुनावणी करू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
✎ Edit

on - शनिवार, १६ मार्च, २०२४,
Filed under - गुन्हे-न्याय , राष्ट्रीय
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा