दिल्लीतील बैठकीत महायुतीचे जागावाटप ठरले; लवकरच घोषणा
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजपाचे महासचिव विनोद तावडे आणि नंतर गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. मनसे महायुतीत येणार हे स्पष्ट झाले असून, लोकसभेच्या जागावाटपात त्यालाही सामावून घ्यावे लागणार आहे. याआधी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाबाबत अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी राज्यातील बहुतांश जागांवर सहमती झाली असून, काही जागांवर सहमती होऊ शकली नव्हती. त्यामुळे जागावाटपाला अंतिम रूप देण्यासाठी शनिवारी रात्री पुन्हा महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत झाली.
महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिलला मतदान होत आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात मतदान असलेल्या गडचिरोली तसेच भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा भाजपाला करता आली नाही. या दोन्ही मतदारसंघावर राष्ट्रवादी काँगेसने दावा केला आहे. महाराष्ट्रातील आणखी काही लोकसभा मतदारसंघाबाबतही महायुतीत एकमत होऊ शकले नाही. भाजपाने २० उमेदवारांच्या नावांची घोषणा आतापर्यंत केली आहे.

on - सोमवार, २५ मार्च, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा