सलग तिसऱ्यांदा घेतली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ
– रालोआ तिसर्या तिसर्या कार्यकाळाचा थाटात शुभारंभ,
नवी दिल्ली, (०९ जुन) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती भवनातील एका भव्य आणि आकर्षक समारंभात सलग तिसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यामुळे देशात भाजपाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या तिसर्या कार्यकाळाचा थाटात शुभारंभ झाला आहे. विदर्भातून नितीन गडकरी आणि बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित कार्यक‘मात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सलग तिसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सलग तीनदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याच्या विक‘माची बरोबरी केली. तब्बल ६२ वर्षांनी हा योग जुळून आला. मोदींनी शपथ घेताच राष्ट्रपती भवनाचा संपूर्ण परिसर मोदी-मोदीच्या घोषणांनी दणाणून गेला.
मोदी यांच्यानंतर दुसर्या क‘मांकावर राजनाथसिंह यांनी शपथ घेतली. त्यानंतर तिसर्या क‘मांकावर अमित शाह यांना शपथ घेण्याची संधी मिळाली. चौथ्या क‘मांकावर नितीन गडकरी यांचा शपथविधी झाला. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही मोदी यांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातच शपथ घेतली होती. शपथविर्धीं समारंभाला सात शेजारी देशांचे राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान उपस्थित होते. नवनिर्वाचित खासदार, केंद्र सरकारच्या विविध वरिष्ठ शासकीय अधिकारी, तिन्ही सेनादलांचे प्रमुख तसेच सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा