अहमदनगरच्या नामांतराविरोधात उच्च न्यायालयात याचिका
राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी ही याचिका दाखल केली. यावर पहिली सुनावणी ही २५ जुलै रोजी होणार आहे. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे अहल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहल्यानगर नावाची घोषणा केली होती. अहमदनगर महापालिकेच्या प्रशासकांनी देखील तसा ठराव पाठवला होता. राज्य सरकारने मंत्रिमंडळात अहल्यानगर नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. सध्या हे प्रकरण केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

on - शनिवार, २० जुलै, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा