बाजारात तुफानी तेजी, सेन्सेक्स ८०,४३६ वर बंद
आशियाई बाजारात आज तेजी आहे. जपानचा निक्केई २.९२% वर आहे. हाँगकाँगचा हँग सेंग १.७३% आणि चीनचा शांघाय कंपोझिट ०.०९२% वर आहे. कोरियाच्या कोस्पीमध्येही १.७९ % वाढ दिसून येत आहे. अमेरिकन बाजारातील डाऊ जोन्स १.३९% च्या वाढीसह ४०,५६३ च्या पातळीवर बंद झाला. छरीवरिं देखील २.३४% वाढून १७,५९४ वर बंद झाला. डझ५०० १.६१% वाढून ५,५४३ अंकांवर बंद झाला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १४ ऑगस्ट रोजी १७,५६५ कोटी रुपयांचे समभाग विकले. या कालावधीत देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी < १२,२६९ कोटी किमतीचे शेअर्स खरेदी केले. म्हणजेच बुधवारी विदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केली होती. काल गुरुवारी स्वातंत्र्यदिनाच्या सुटीमुळे बाजारपेठ बंद होती. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीमुळे काल गुरुवारी (१५ ऑगस्ट) शेअर बाजार बंद होता. यापूर्वी बुधवारी (१४ ऑगस्ट) बाजारात तेजी दिसून आली होती. सेन्सेक्स १५० अंकांच्या वाढीसह ७९,०६५ वर बंद झाला. तर निफ्टीमध्ये केवळ ४ अंकांची वाढ झाली. तो २४,१४३ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीच्या ५० समभागांपैकी २४ वधारत होते तर २६ घसरत होते. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी १६ वाढले आणि १४ घसरले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा