सेफ हाऊसमध्ये आहेत शेख हसीना!
शेख हसीना बांगलादेश हवाई दलाच्या सी-१३० जे हरक्यूलिस या वाहतूक विमानाने प्रवास करत आहेत. शेख हसीना यांना भारतात घेऊन जाणार्या बांगलादेशी सी-१३० ला सुरक्षा देण्यासाठी पश्चिम बंगालच्या हाशिमारा स्क्वॉड्रनमधून दोन राफेल विमाने उडवण्यात आली. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी गरज पडल्यास कोणतीही कारवाई करण्यास तयार होते. गरज पडल्यास भारतीय लष्कराला कोणत्याही कारवाईसाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले. शेख हसीना यांची बहीण रेहाना ब्रिटिश नागरिक आहे. दरम्यान, ब्रिटीश सरकारने बांगलादेशात गेल्या काही आठवड्यांत घडलेल्या घटनांच्या संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र तपासाची मागणी करून ब्रिटन आश्रय देणार नाही, असे संकेत दिले आहेत.
on - मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४,
Filed under - परराष्ट्र , राष्ट्रीय , external-affairs , national
You can follow any responses to this entry through the RSS 2.0

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा