शांतता भंग केली तर मिळेल सडेतोड उत्तर

- बस्तरमध्ये अमित शाह यांचा नक्सलवाद्यांना ठाम इशारा,

बस्तर, (४ ऑक्टोबर) – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह शनिवारी छत्तीसगडच्या जगदलपूर येथे आयोजित बस्तर दशहरा महोत्सवात सहभागी झाले. या वेळी त्यांनी नक्सलवाद्यांशी कोणत्याही प्रकारच्या चर्चेची शक्यता फेटाळून लावत स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी शरणागती पत्करावी आणि बस्तरच्या विकासात सहभागी व्हावे. शाह यांनी पुन्हा एकदा ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्सलवाद संपवण्याचा संकल्प व्यक्त केला आणि सांगितले की, बस्तरमध्ये शांतता भंग करणाऱ्यांना सुरक्षा दल कठोर उत्तर देतील.

बस्तर दशहरा लोकोत्सव-२०२५ आणि स्वदेशी मेळा कार्यक्रमात लालबाग परेड मैदानावर बोलताना शाह म्हणाले की, ७५ दिवस चालणारा हा महोत्सव केवळ आदिवासी समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक अनोखा सांस्कृतिक उत्सव आहे.

शाह म्हणाले की, दिल्लीतील काही लोक अनेक वर्षे नक्सलवाद हा विकासासाठीची लढाई आहे असा भ्रम पसरवत होते, पण वस्तुस्थिती अशी आहे की बस्तरच्या विकासाला अडथळा ठरणारा मुख्य कारण नक्सलवादच आहे. देशातील प्रत्येक गावात वीज, पिण्याचे पाणी, रस्ते, शौचालय, आरोग्य विमा आणि मोफत धान्य पोहोचले आहे, पण बस्तर मात्र या प्रगतीपासून दूर राहिला आहे.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने आश्वासन देतो की ३१ मार्च २०२६ नंतर नक्सलवादी बस्तरच्या विकासाला आणि लोकांच्या हक्कांना अडथळा ठरू शकणार नाहीत. जे तरुण नक्सलवादाच्या मार्गावर गेले आहेत त्यांनी शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात यावे.

छत्तीसगड सरकारने देशातील सर्वोत्तम शरणागती धोरण तयार केले असून गेल्या एका महिन्यात ५०० हून अधिक लोकांनी शरणागती पत्करली आहे. शाह यांनी नक्सलवाद्यांना शरणागतीची विनंती केली आणि सांगितले की ज्या गावात नक्सलवाद पूर्णतः संपेल तिथे सरकार विकासासाठी १ कोटी रुपये देईल.

स्वदेशी मेळा संदर्भात शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी वस्तूंवर भर दिला आहे. आता प्रत्येक घराने संकल्प करावा की फक्त देशात तयार झालेल्या वस्तूंचाच वापर करू. प्रत्येक व्यापाऱ्याने ठरवावे की त्यांच्या दुकानात विदेशी वस्तू विकल्या जाणार नाहीत. जर १४० कोटी लोकांनी हा संकल्प आत्मसात केला, तर भारताला जगातील सर्वोच्च आर्थिक शक्ती बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.


✎ Edit

Posted by - Admin,
on - रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS