कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये ४८% विषारी घटक
- मध्य प्रदेशात संपूर्ण बंदी,
छिंदवाडा, ४ ऑक्टोबर – कोल्ड्रिफ कफ सिरप पिल्यानंतर छिंदवाडा जिल्ह्यात ११ मुलांचे मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण मध्य प्रदेशात या औषधावर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृत मुलांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. चेन्नई प्रयोगशाळेच्या तपासणीत या सिरपमध्ये ४८.६% डाएथिलीन ग्लायकॉल आढळले, जो एक विषारी घटक आहे.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सांगितले की राज्यात या औषधाची विक्री पूर्णतः बंद करण्यात आली आहे आणि दोषींना कोणतीही माफी दिली जाणार नाही. राज्यभर छापे टाकून औषधे जप्त केली जात आहेत. राज्य सरकार आजारी मुलांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार आहे.
इतर औषधांवरही बंदी स्रेसन फार्मास्युटिकल कंपनीच्या इतर औषधांवरही बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रक डॉ. दिनेश कुमार मौर्य यांनी सांगितले की जनहित लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. सर्व ड्रग इन्स्पेक्टरना औषधांची विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

on - रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५,
Filed under - मध्य प्रदेश-छत्तीसगड , राज्य
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा