किमान तापमान : 28.85° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 89 %
वायू वेग : 1.68 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
29.21°C - 32.15°C
sky is clear28.65°C - 31.48°C
sky is clear28.57°C - 30.39°C
sky is clear28.58°C - 30.33°C
broken clouds28.41°C - 30.14°C
broken clouds28.64°C - 30.26°C
light rain– आज सर्वपक्षीय बैठक,
नवी दिल्ली, (३० जानेवारी) – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३१ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ९ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने ३१ जानेवारीला या अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. मुर्मू यांचे अभिभाषण यावेळी संसदेच्या केंद्रीय कक्षात न होता नवीन संसद भवनातील लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू यांचे यावेळी प्रथमच नवीन संसद भवनात आगमन होणार आहे.
१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन् अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. यावर्षी लोकसभेची निवडणूक असल्यामुळे नियमित अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही. मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील हा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकार जुुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनात नियमित अर्थसंकल्प सादर करेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारने उद्या सकाळी ११.३० वाजता संसद भवन परिसरातील ग्रंथालय इमारतीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरकारतर्फे केले जाणार आहे. यापूर्वीचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरले होते. सुरक्षाव्यवस्थेच्या उल्लंघनाची गंभीर घटनाही त्यात घडली होती. यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. त्याची परिणती दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांच्या जवळपास दीडशे सदस्यांच्या निलंबनात झाली होती.