स्टायलिश साडी

भारतीय स्त्रीचा पारंपरिक पोशाख साडी आहे. कितीही प्रयोग केले तरी साडी तीच असते. बदलते फक्त स्टाईल. सध्या दररोज नवनवीन फॅशनच्या साड्या बाजारात येत आहेत. अशा महाग साड्या विकत न घेता कमी किमतीच्या साडीला सुद्धा तुम्ही ‘न्यू लुक’ देऊ शकता. त्यासाठी खाली दिलेल्या टिप्सचा वापर करा.

* प्लेन साडीत प्लेट्‌स आणि पदरावर मोठे तारे लावून बाकीची साडी प्लेन राहू द्या.
* सध्या बर्‍याच प्रकारचे साडी वर्क फॅशनमध्ये आहेत. आपणसुद्धा आपल्या साडीला आवडीप्रमाणे ड्रेस देऊन त्यात तारे, मोती, मिरर, पाइप इत्यादी वर्क करू शकता.
* आपल्या साडीचे सौंदर्य वाढविण्यासाठी प्रिंटेड साडीवर चिकटणारे तारे लावू शकता.
* बॉर्डर आणि पदराला जरदौसी वर्कने सजवू शकता.
* संध्याकाळच्या पार्टीत मोती वर्क केलेली साडी छान लूक देते.
* प्लेन व जॉर्जेटच्या साडीवर सॅटिनच्या फुलांचे वर्क करावे. ते फारच छान दिसते.
* कॉटनच्या साडीवर पॅचवर्क केल्याने सजावट वाढते.
* आपल्या साडीला आकर्षक बनविण्यासाठी त्यावर डिझाइन काढले पाहिजे. उदा. काथा वर्क, नॉटस्टिच, सिंधी टाक, लेजी-डेजी इत्यादी काढल्याने साडीच्या सौंदर्यात वाढ होते.
* सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेस वापरात आहेत. आपल्या कोणत्याही साडीला लेस लावून त्याला तुम्ही तिचे वजन वाढवू शकता.
* साडीवर बंधेज वर्क करून सुद्धा त्याला नवीन रूप देऊ शकता.
* नेटच्या साडीची हल्ली फॅशन आहे. नेटवर आपल्या आवडीनुसार वर्क करून त्याला नवीन रूप देऊ शकता.
* काळा व पांढरा हे असे रंग आहेत ज्यावर कोणतेही वर्क करून आपण पार्टीची शान वाढवू शकता.
मोसम आणि साडी
* पावसाळ्यात शिफॉन, जॉर्जेट, पूनम इत्यादी साड्या नेसायला पाहिजेत. त्यातही लेमन यलो, लाइट ग्रीन, मँगो इत्यादी कलर्स छान दिसतात. रोज जास्त चालावे लागत असेल तर डार्क प्रिंटच्या सिंथेटिक साड्या उत्तम.
* हिवाळ्यात थोड्या हेवी वर्कच्या साड्या नेसल्या तरी चालतात. या मोसमात रामाग्रीन, ब्ल्यू, रेड, मरून कलर्सच्या साड्या नेसायला पाहिजे.
* उन्हाळ्यात कॉटनच्या साड्या जास्त आरामदायक असतात. या काळात पीच कलर, स्काय ब्ल्यू, पिंक इत्यादी कलर्सच्या साड्या बघायला बर्‍या वाटतात.
साड्यांची काळजी
* आपल्या साड्या नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे. हँडवाश असतील तर घरी धुवायला पाहिजे किंवा ड्रायक्लीन करायला हव्या.
* साडीला लागणारे फॉल रूंदीला थोडे जास्त असावे आणि चांगल्या दोर्‍यांचा वापर केला पाहिजे.
* आपल्या साड्यांना साडी कव्हरमध्ये ठेवायला पाहिजे. साड्यांना पेपर, पॉलीथिन किंवा सुती कपड्यात सावधगिरीने ठेवायला पाहिजे.
* साडी सोबत नेहमी मॅचिंग ब्लाऊज घालायला पाहिजे. साड्यांना त्यांच्या ब्लाऊज सेट सोबत ठेवायला हवे.
* साड्यांना वॉर्डरोबमध्ये वेगवेगळ्या कप्प्यात ठेवायला हवे. उदा. पार्टी वियर, जॉब वियर, ट्रेडिशनल. म्हणजे वेळेवर शोधायला वेळ लागणार नाही.
* वॉशेबल साड्या धुतल्यावर कडक उन्हात वाळवू नये. कारण त्याने रंगावर विपरीत परिणाम होतो. रंग उतरतो. परिणामी साडी खराब होण्याची शक्यता असते.
साडी कशी नेसावी?
तुम्ही रोज साडी नेसता तशीच साडी नेहमी नेसायला पाहिजे असे नाही. साडीला नेसायची पद्धत साडीनुसार वेगवेगळी असते. तुम्ही तुमच्या उंची, प्रकृती आणि गरजेनुसार त्याची निवड करू शकता जसे : फ्री पदराची साडी, पिनअप साडी, उलट्या किंवा सरळ पदराची, लहंगा स्टाईल साडी, मुमताज स्टाईल साडी, बंगाली साडी इत्यादी स्टाईलच्या साड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलून घालू शकता.

✎ Edit

Posted by - Admin,
on - सोमवार, ७ जानेवारी, २०१३,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS