नो डेथ कार

वाहन चालवताना होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी लंडन येथील वॉल्हो कंपनीने संगणकीय प्रणालीवर आधारीत ‘नो डेथ कार’ची रचना केली असून ही कार संभाव्य अपघाताची माहिती संगणकीय प्रणालीद्वारे कारचालकाला देते, असा दावा या कंपनीने केला आहे. ही कार बाजारात यायला आणखी आठ वर्षे लागतील,असे व्हॉल्वो कंपनीच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.व्हॉल्वोच्या इतर कारप्रमाणे या कारमधील इतर यंत्रणा अद्ययावत, अत्याधुनिक असतील, असंही त्यांनी सांगितले आहे. व्हॉल्वोचा प्रयोग १०० टक्के यशस्वी झाल्याचे अपघाताचे दुष्टचक्र नक्कीच आटोक्यात येऊ शकेल.

चालकाला संभाव्य धडकेची कल्पना देण्यासाठी या कारमध्ये खास सेन्सर बसवण्यात येणार आहेत. ज्यायोगे चालक वेळीच सावध होऊन अपघात टाळण्यासाठी हालचाल करू शकेल. इतकंच नव्हे तर, या कारमध्ये ‘ऑॅटो पायलट मोड’ही असल्याने अगदीच गांगरलेला ड्रायव्हर, बिकट प्रसंगी या सुविधेचा आधार घेऊ शकतो. ‘ऑॅटो मोड’ वर ही कार अपघातापासून स्वतःच स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करेलच, पण चालकही सुखरूप राहील याची काळजी घेईल. त्याशिवाय, ही कार क्रॅशप्रूफ असल्यानं, अगदी छोटी-मोठी धडक बसलीच, तरी आतल्या व्यक्तींना खरचटणारही नाही, असा दावा कंपनीने केला आहे.
१ डॉलरचा मॅसेज
फेसबुकवर अनोळखी व्यक्तीला मॅसेज पाठविण्यासाठी १ डॉलरचे शुल्क आकारण्याचा कंपनीचा विचार असून त्याच्या व्यवहार्यतेबद्दल चाचण्या सुरू आहेत.
आतापर्यंत फेसबुकवर कुणालाही मॅसेज पाठविण्याबद्दल कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र अनोळखी व्यक्तीला मॅसेज पाठविण्यासाठी नाममात्र आकारणी केल्यास स्पॅम मॅसेजेसना आळा बसेल; मॅसेजमधून व्हायरस येण्याचे प्रमाण घटेल; त्याचबरोबर ज्यांना खरोखरंच महत्वाचा मॅसेज फ्रेंड लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीला पाठविणे आवश्यक आहे; त्यांना अधिक वेगवान आणि दर्जेदार सेवा देणे शक्य होईल;असा विश्वास कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
फेसबुकने यापूर्वीच पेड पोस्टची सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत ग्राहकांची पोस्ट ६ डॉलर्स शुल्क आकारणी करून अधिक ठळक, अधिक काळ आणि त्वरित दिसते.
प्लॅस्टिक सर्जरी
अपघातात जखमी होऊन विद्रूपता आलेल्या, भाजल्यामुळे विद्रूपता आल्यास अथवा शस्त्रक्रियेमुळे शरीरावर आलेल्या खुणा नष्ट करण्यासाठी प्लॅस्टीक सर्जरी प्रामुख्याने केली जाते असा आपला समज असेल तर तो चुकीचा आहे असे म्हणावे लागेल. कारण जगभर आज प्लॅस्टीक सर्जरी हा मोठा उद्योगच बनला असून त्यात प्रामुख्याने सौंदर्यवर्धनासाठी अशा शस्त्रक्रिया करणार्‍यांची संख्या प्रचंड मोठी आहे. अब्जावधी डॉलर्सची उलाढाल या व्यवसायात होत असून जगातील २० देशांत हा व्यवसाय वेगाने वाढताना दिसून आले आहे असे इंटरनॅशनल सेंटर फॉर ऍस्थेनिक प्लॅस्टीक सर्जरीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
या देशांची यादीही या संस्थेने दिली असून त्यानुसार पहिल्या क्रमांकावर कोरिया या देश असून तेथे अशी शस्त्रक्रिया करणार्‍यांचे प्रमाण दरहजारी २० आहे.येथे वर्षाला साधारण ७,७०,००० प्लॅस्टीक सर्जरी केल्या जातात. दुसर्‍या क्रमांकावर ग्रीस असून तिसर्‍या क्रमांकावर आहे इटाली.या दोन्ही देशांत हे प्रमाण हजारी १६ व १३ असे आहे. त्यापाठोपाठ चवथ्या क्रमांकावर ब्राझील असून तेथे हे प्रमाण हजारी १० आहे.कोलंबिया पाचव्या स्थानावर असून तेथे हे प्रमाण हजारी ११.७ इतके आहे व तेथे वर्षात ४लाख ९० हजार शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
अमेरिकेचा नंबर सहावा आहे तर त्यापाठोपाठ तैवान, जपान, फ्रान्स, मेक्सिको, कॅनडा, व्हेनेझुएला, नेदरलँडस, स्पेन, ऑस्ट्रेलिया, तुर्कस्थान, जर्मनी, सौदी अरेबिया, अर्जेंटिना, रोमानिया या देशांचा क्रमांक लागतो.

✎ Edit

Posted by - Admin,
on - सोमवार, ७ जानेवारी, २०१३,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS